Employment India: 10 लाख सरकारी पदांसाठी भरती; पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा

देशातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.  पुढच्या दीड वर्षांमध्ये देशातील 10 लाख सरकारी पदे भरणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात एक ट्वीटही करण्यात आले आहे.

महागाई आणि बेरोजगारी या दोन मुद्द्यांवरुन सध्या विरोधक सरकारला घेरत आहेत. मागच्या काही वर्षांपासून रेल्वे आणि मिलिट्री या क्षेत्रांमध्ये खूप कमी भरती झाली आहे. रेल्वे भरतीवरुन मोठ्या प्रमाणात तरुणाईत उद्रेक होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा: ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक; हॅकर्सकडून एक गाणंही अपलोड )

दीड वर्षांत भरली जाणार 10 लाख पदे 

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीत सर्व विभागांमधील पदांचा आढावा घेतला होता. त्यानुसार, Human Resources in all departments and ministries या खात्याला  2023 पर्यंत 10 लाख पदे भरण्याचा आदेश देण्यात आला आहे.  गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या निवडणुकाही आहेत. त्या पार्श्वभूमीवरही हा निर्णय घेतला गेला असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here