PM Modi to Mohammed Shami : वेल प्लेड शामी! PM मोदींनी दिली शाबासकीची थाप!

173
Mohammed Shami : दुखापतीनंतर मोहम्मद शमी नेट्समध्ये परतला

आयसीसी विश्वचषक २०२३ (ICC World Cup 2023) स्पर्धेचा उपांत्य फेरीचा पहिला सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला.या सामन्यात मोहम्मद शामीनं शानदार गोलंदाजी करत सात विकेट्स चटकावल्या. फक्त देशच नाही अख्खं जग शामीच्या गोलंदाजीवर फिदा झालंय, अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही शामीच्या गोलंदाजीची भूरळ पडली आहे. शामीच्या गोलंदाजीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी भरभरून कौतूक केलं आहे. (PM Modi to Mohammed Shami)

(हेही वाचा : Mumbai Air Pollution : फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईतील प्रदूषण पातळी वाईट स्तरावर)

टीम इंडियानं विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला आहे. न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर संपूर्ण भारतात आनंदाचं वातावरण होतं. तसेच त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. अशातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंचे अभिंनंदन केले.टीम इंडियाच्या सेमीफायनलमधील धमाकेदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. की, “आजची सेमीफायन अधिक खास बनली ती शानदार वैयक्तिक कामगिरीमुळे, मोहम्मद शामीची तुफानी गोलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या भावी पिढ्यांच्या स्मरणात राहील. वेल प्लेड शामी!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.