८ मार्च या महिला दिनी (Women’s Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सोशल मीडिया अकाउंट, X आणि Instagram खाते महिला हाताळणार आहेत. या दिवशी काही प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिला त्यांचे अनुभव देशवासियांशी शेअर करू शकतील.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, “या वेळी, महिला दिनानिमित्त मी एक उपक्रम राबवणार आहे. तो आपल्या महिला शक्तीला समर्पित असेल. या विशेष प्रसंगी, मी माझे सोशल मीडिया अकाउंट जसे की, X आणि Instagram आपल्या देशातील काही प्रेरणादायी महिलांना एका दिवसासाठी देणार आहे. ज्या महिलांनी विविध क्षेत्रात यश मिळवले आहे, नवनवीन प्रयोग केले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ८ मार्च रोजी, त्या त्यांचे काम आणि अनुभव देशवासियांशी शेअर करतील.” मन की बातच्या (Mann Ki Baat) ११९ व्या भागात त्यांनी ही घोषणा केली आहे.
(हेही वाचा – Telangana Tunnel मध्ये अडकलेल्या 8 मजूरांच्या वाचण्याची शक्यता धुसर; 11 किमी पाणी भरलं)
A social media takeover on 8th March as a tribute to our Nari Shakti! Do visit the Open Forum on the NaMo App for more details…#MannKiBaathttps://t.co/TLa5y95noc
— Narendra Modi (@narendramodi) February 23, 2025
यश, अनुभव आणि आव्हाने देशाशी शेअर करा
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील महिलांना सक्षम करण्यासाठी एक अनोखा पुढाकार जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या या महिला या प्लॅटफॉर्मचा वापर त्यांचे यश, अनुभव आणि आव्हाने देशाशी शेअर करण्यासाठी करतील. प्लॅटफॉर्म माझा असू शकतो, पण त्यांचे अनुभव, आव्हाने आणि यश तिथे चर्चिले जातील. (PM Modi social media)
पंतप्रधान मोदी यांनी महिलांना NAMO अॅपद्वारे (NAMO App) या विशेष उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि त्यांना त्यांचे संदेश जागतिक स्तरावर पसरवण्याचे आवाहन केले. “जर तुम्हाला या संधीचा फायदा घ्यावा, असे वाटत असेल, NAMO अॅपवर तयार केलेल्या विशेष मंचाद्वारे, या प्रयोगाचा भाग बना आणि माझ्या X आणि Instagram अकाउंटद्वारे तुमचा संदेश जगभर पसरवा. तर या महिला दिनी (Women’s Day), आपण महिलांच्या अदम्य शक्तीचा उत्सव साजरा करूया आणि त्यांचा आदर करूया” असे ते म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community