काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जी-20 बैठक घेण्यावर पाकिस्तान आणि चीनचा आक्षेप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, आम्हाला आमच्या देशाच्या कोणत्याही भागात बैठक घेण्याचा अधिकार आहे. गेल्या आठवड्यात पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले होते. या मुलाखतीची माहिती रविवारी समोर आली.
खरं तर, चीन आणि पाकिस्तानने काश्मीरच्या काही भागात G-20 कार्यक्रम आयोजित करण्यावर आक्षेप घेतला होता. काश्मीर हा वादग्रस्त भाग आहे. त्यामुळे येथे कार्यक्रम होऊ नये, असे दोन्ही देशांनी म्हटले होते. याबाबत पीएम मोदी म्हणाले की, आम्ही काश्मीर आणि अरुणाचलमध्ये बैठक घेण्याचे टाळले असते तर असा प्रश्न योग्य ठरला असता. आपला देश खूप विशाल, सुंदर आणि विविधतेने परिपूर्ण आहे. देशात G20 ची बैठक होत असताना देशाच्या प्रत्येक भागात बैठका होणार हे स्वाभाविक आहे. यापूर्वी 28 ऑगस्ट रोजी चीनने नकाशा जारी करून अरुणाचल आणि अक्साई चीनला आपला हिस्सा घोषित केले होते. पीएम मोदींच्या या वक्तव्याला चीनच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणूनही पाहिले जात आहे.
(हेही वाचा – Amit Shah on Stalin : ‘INDIA आघाडी राजकारणासाठी सनातन धर्माचा अपमान करत आहे – अमित शाह यांचा घणाघात)
पीएम मोदी म्हणाले की, भारताच्या G20 अध्यक्षपदावरून अनेक सकारात्मक बदल होत आहेत, त्यातील काही माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. जगाचा दृष्टीकोन, जो आतापर्यंत जीडीपीवर केंद्रित होता, तो आता मानवांवर केंद्रित होत आहे. या बदलात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community