PM Narendra Modi : मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

188
PM Narendra Modi : मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द
PM Narendra Modi : मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार होते. हवामान खात्याने पुण्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने त्यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. २६ सप्टेंबर या दिवशी वेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन, तसेच २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार होते. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाच्या उद्घाटनामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भूमीगत विभागाचा खर्च सुमारे १ हजार ८१० कोटी रुपये आहे. हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

(हेही वाचा – World Environment Health Day : जागतिक पर्यावरण आरोग्य दिन का साजरा केला जातो?)

परतीच्या पावसाचा प्रचंड जोर असल्याने आणि हवामान विभागाने पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्दा झाला आहे. येत्या काही तासांमध्ये पुण्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान मोदी हे गुरुवारी पुण्यात मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी येणार होते. एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात मोदींची विशाल सभा आयोजित करण्यात आली होती.

पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड चिखल झाला होता. त्यामुळे पर्यायी जागा म्हणून गणेश क्रीडा कला केंद्राच्या सभागृहात मोदींची सभा घेण्याचा विचार सुरु होता. मात्र, या सभागृहातील कार्यक्रम खुल्या मैदानाच्या तुलनेत लहानच होईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पुणे दौरा रद्द केल्याचे समजते. त्यामळे पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.