PM Rojgar Mela 2022: देशातील तब्बल १० लाख युवकांना मिळणार जॉब; कसा, कुठे करायचा अर्ज? वाचा सविस्तर

109

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 ऑक्टोबर रोजी पीएम रोजगार मेळावा लाँच केला होता. याद्वारे केंद्र सरकारच्या विविध सरकारी विभागांमध्ये 10 लाख भरती करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी तब्बल 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देऊन त्याची सुरुवात केली. यानंतर, यापूर्वी सीआयएसएफसह इतर अनेक विभागांमध्ये भरती झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. येत्या 18 महिन्यांत 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे मोदी सरकारचे लक्ष्य आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम सर्व मंत्रालये आणि विभागांना सूचना दिल्या आहेत. या रोजगार मेळाव्याद्वारे 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, आयकर विभागासह विविध विभागांमध्ये ही भरती केली जात आहे. अहवालानुसार, केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 2023 च्या अखेरीस गट अ श्रेणीतील एकूण 2 हजार 386, गट ब मधील 25 हजार 836 आणि गट क मधील 7.6 लाख रिक्त जागेवर भरती केली जाणार आहे. विविध शासकीय विभागांतर्गत एकूण 10 हजार पदे एकत्रितपणे भरण्यात येणार आहेत. मात्र या पंतप्रधान रोजगार मेळाव्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणाला अर्ज करता येणार हे सविस्तर जाणून घ्या…

(हेही वाचा – मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर! शिवनेरी, अश्वमेधसाठी MSRTC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय)

असा करा अर्ज

  1. पीएम रोजगार मेळाव्याची माहिती यूपीएससी, एसएससी इत्यादी विविध भरती मंडळांवर उपलब्ध असणार आहे.
  2. पीएम रोजगार मेळवा 2022 ची लिंक भर्ती बोर्डाच्या वेबसाइटवर तुम्हाला दिसेल.
  3. यानंतर पीएम रोजगार मेळवा 2022 च्या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.

कोणाला करता येणार अर्ज

  • पंतप्रधान रोजगार मेळाव्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 29 वर्षे असणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास संबंधित विषयात बॅचलर डिग्री / 10वी, 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर उमेदवारावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.