फक्त २० रुपयात २ लाखांचा विमा; सरकारच्या या योजनेतून तुम्हाला होईल मोठा फायदा!

खासगी विम्यासाठी जास्त पैसे आकारले जातात त्यामुळे अनेकजण विमा घेणं टाळतात. जे लोक पैशाअभावी विम्याचा लाभ घेऊ शकत नाहीत त्यांना मदत करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) लाभ घेत सामान्य माणूस आपल्या कुटुंबाला सुरक्षेची हमी देऊ शकतो.

( हेही वाचा : 7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकरच लागू होणार?)

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेविषयी…

या योजनेत तुम्ही वर्षाला फक्त २० रुपयांची गुंतवणूक करून २ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळवू शकता. ही एक अपघात विमा योजना आहे. अपघातात मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास या विम्याचा लाभ मिळतो. १८ ते ७० वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत अपघातात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपये मिळतात. अंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाईल.

दरवर्षी २० रुपये बॅंकेतून कापले जातील. यासाठी तुम्हाला दरवर्षी १ जूनपूर्वी फॉर्म भरणे आवश्यक आहे. तुमचे ज्या बॅंकेत खाते आहे तेथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. यासाठी तुमचे आधार कार्ड बॅंकेशी लिंक केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुमचे बॅंक खाते बंद झाले किंवा प्रिमियम कापण्याच्या वेळी बॅंकेत पुरेशी रक्कम नाहीये तर तुमचा विमा रद्द होऊ शकतो. विमा योजना १ जून ते ३१ मे या कालावधीत चालते. म्हणजेच, ३१ मे रोजी प्रीमियम कापला जातो आणि नंतर पॉलिसीचे पुढील एक वर्षासाठी आपोआप नूतनीकरण केले जाते. या योजनेचा वार्षिक प्रीमियम पूर्वी फक्त १२ रुपये होता, तो आता २० रुपये करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत येणाऱ्या अटीशर्थींची माहिती तुम्ही संबंधित बॅंकेत घेऊ शकता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here