PM Svanidhi Mumbai Hawkers : दुसऱ्या टप्प्यातील पीएम स्वनिधीला फेरीवाल्यांचा अल्प प्रतिसाद

भविष्यात फेरीवाल्यांची पात्रता निश्चित करताना या स्वनिधीचा पुरावा ग्राह्य धरल्यास आपण पात्र होऊ शकतो.

707
PM Svanidhi Mumbai Hawkers : दुसऱ्या टप्प्यातील पीएम स्वनिधीला फेरीवाल्यांचा अल्प प्रतिसाद
PM Svanidhi Mumbai Hawkers : दुसऱ्या टप्प्यातील पीएम स्वनिधीला फेरीवाल्यांचा अल्प प्रतिसाद

फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभतेने भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेतंर्गत आजमितीस सुमारे ९९ हजार फेरीवाल्यांना दहा हजारांपर्यंत कर्ज मंजूर करण्यात आले असून हे दहा हजाराचे कर्ज फेडल्यानंतर पुढील २० हजारांचे कर्ज मिळवणाऱ्या फेरीवाल्यांचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे २० हजारापर्यंतच्या कर्जाचा लाभ पहिल्या टप्प्यात लाभ घेणाऱ्या फेरीवाल्यांच्या तुलनेत केवळ सहा ते साडेसहा टक्के एवढेच आहे. त्यामुळे पीएम स्वनिधीचा लाभ पहिल्या टप्प्यात घेणाऱ्या फेरीवाल्यांनी दुसऱ्या टप्प्यात याकडे दुर्लक्ष केले असून दहा हजारांच्या कर्जाचा केवळ आपली नोंदणी करून घेण्यासाठी तसेच आपला दावा सिध्द करण्यासाठीची फेरीवाल्यांनी अर्जाचा लाभ घेतला असल्याचे बोलले जात आहे. (PM Svanidhi Mumbai Hawkers)

१ लाख १६ हजारांहून अधिक अर्जदारांना योजनेंतर्गत शिफारसपत्रे

कोविड १९ आणि लॉकडाऊननंतर फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभतेने भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी जून २०२० मध्ये प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही योजना सुरू करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत एका विशेष बैठकीचे आयोजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या योजनेंतर्गत मुंबईतील १ लाखाहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज वाटपाचा लाभ देण्याचा निर्धार केला होता. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या या बहुआयामी कामामुळे आजपर्यंत १ लाख १६ हजारांहून अधिक अर्जदारांना या योजनेंतर्गत शिफारसपत्रे देण्यात आली होती. तर १ लाखाहून अधिक अर्जदारांचे अर्ज मंजूर करण्यात आले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने जानेवारी २०२३ रोजी केला होता. (PM Svanidhi Mumbai Hawkers)

(हेही वाचा – Rahul Shewale Meet PM Modi : राहुल शेवाळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट)

५० हजार कर्जाचा ‘इतक्या’ फेरीवाल्यांनी घेतला लाभ

परंतु प्रत्यक्षात दहा हजारांच्या कर्जाचा लाभ सुमारे ९९ हजार ३०० लोकांनी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दहा हजारांचे कर्ज फेडल्यानंतर फेरीवाल्याला २० हजारांचे कर्ज मंजूर केले जाते, या २० हजारांच्या कर्जासाठी ६ हजार ७०० फेरीवाल्यांनी लाभ घेतला तर २० हजार रुपयांचे कर्ज फेडल्यानंतर ५० हजारांचे कर्ज फेरीवाल्यांना दिले जाते. या ५० हजार कर्जाचा लाभ केवळ १३७ फेरीवाल्यांनी घेतला असल्याची माहिती प्राप्त होत आहे. (PM Svanidhi Mumbai Hawkers)

दरम्यान फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी जो प्रतिसाद फेरीवाल्यांनी दिला तो केवळ भविष्यात आपल्याला पात्र होता यावे म्हणूनच होते. भविष्यात फेरीवाल्यांची पात्रता निश्चित करताना या स्वनिधीचा पुरावा ग्राह्य धरल्यास आपण पात्र होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घेतला. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कर्जाचा लाभ घेण्यास तेवढा प्रतिसाद लाभणार नाही. कारण तेवढी आवश्यकता भासत नसल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील प्रतिसाद अल्पच असेल असेही फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. (PM Svanidhi Mumbai Hawkers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.