PMP Bus अचानक बंद पडण्याचे प्रमाण घटले

67
PMP Bus अचानक बंद पडण्याचे प्रमाण घटले

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस (PMP Bus) अचानक बंद पडण्याचे प्रमाण (ब्रेक डाऊन) २०२३ च्या तुलनेत गेल्या वर्षभरात घटले आहे. २०२३ मध्ये १७,७८४ बस अचानक बंद पडण्याच्या घटना घडल्या होत्या, तर २०२४ मध्ये १५,७१९ बस अचानक बंद पडल्याच्या घटना घडल्या. पीएमपी प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.

(हेही वाचा – Drugs Seized : मुंबईत 22 कोटी रुपयांचे 2.2 किलो कोकेन जप्त)

पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील उपनगरांपर्यंत पीएमपी बस जाते. पीएमपीमधून लाखो प्रवासी रोज प्रवास करतात. अचानक बस (PMP Bus) बंद पडणे, तांत्रिक बिघाड, अपघात, अनुचित प्रकारांमुळे प्रवाशांना नियोजित ठिकाणी जाण्यास विलंब होतो. पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी १७,७८४ बस अचानक बंद पडण्याच्या घटना घडल्या.

(हेही वाचा – Donald Trump यांचा एक निर्णय आणि बांगलादेशनंतर आता पाकिस्तानला मोठा झटका)

पीएमपी प्रशासनाने दुरुस्ती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केल्यानंतर बस बंद पडण्याचे प्रमाण दोन हजारांनी कमी झाले. त्यामुळे २०२४ मध्ये १५,७१९ बस बंद पडल्या. तसेच, केंद्र सरकारच्या नियमानुसार आयुर्मान संपलेल्या ३२७ बस तातडीने सेवेतून काढून टाकण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. पीएमपीने बस (PMP Bus) अचानक बंद पडण्याबाबत तातडीने तोडगा काढावा, प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात असल्याची प्रतिक्रिया पीएमपी प्रवासी मंचाच्या जुगल राठी यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.