PMP Bus : ‘पीएमपी’च्या ताफ्यात लवकरच येणार ४०० बसेस

134
PMP Bus : नवीन वर्षात पीएमपीच्या ताफ्यात येणार नव्या 1600 बस

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपी) आणि केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेच्या (सीआयआरटी) अधिकाऱ्यांनी ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बसच्या प्रतिकृतीची (प्रोटोटाइप) पाहणी केली असून, त्याच्या उत्पादनाला मंजुरी दिली आहे. लवकरच बसच्या उत्पादनाला सुरुवात होईल. (PMP Bus)

फेब्रुवारीमध्ये ४०० नवीन सीएनजी बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे प्रवास सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यातून दररोज सुमारे तीन लाख प्रवाशांची वाहतूक होईल. (PMP Bus)

(हेही वाचा – Secular शब्दावरून नेटकऱ्यांकडून मुंब्राच्या आव्हाडांना दिले बौद्धिक!)

‘पीएमपी’मध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन बसचा प्रश्‍न रेंगाळला होता. संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळूनही बसखरेदीला उशीर झाला. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण सांगण्यात आले. आता नवीन बस खरेदीला गती प्राप्त झाली आहे. (PMP Bus)

नुकतेच ‘सीआयआरटी’ व ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांनी एकत्रित नवीन बसच्या प्रोटोटाइपची पाहणी केली. त्याबद्दल दोन्ही संस्था सकारात्मक असून, लवकरच उत्पादनास सुरुवात होणार आहे. फेब्रुवारीमध्ये ४०० बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होतील, असे नियोजन केले आहे. (PMP Bus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.