पुणेकरांच्या खिशाला कात्री! बस तिकिटांच्या दरात किती होणार वाढ?

141

पुणे शहरात तीन दिवसांपूर्वी मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेट्रो सेवेचे उद्घाटन केले आहे. पुण्यात ट्रॅफिकमुळे अनेकांचा खोळंबा होतो त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पुणेकरांना केले होते. परंतु आता पुणेकरांच्या खिशावर भर पडण्याची शक्यता आहे. पीएमपी बस सेवा तोट्यात सुरु असून, हा तोटा भरून काढण्यासाठी तिकिटांच्या दरात वाढ केली जाणार आहे.

( हेही वाचा : भोजन थाळीतही घोटाळा, 26 रुपयांच्या थाळीसाठी 62 रुपये मोजावे लागताहेत! )

तिकीट दरात वाढ

ही दरवाढ ग्रामीण भागातील तिकीटदरात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच दैनंदिन 70 रुपयांचा पासही बंद केला जाणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील तिकिटाचे दर हे एसटी बस प्रमाणे होणार आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांना बसणार आहे. इंधनाचे वाढलेले दर आणि पीएमपी बससेवा तोट्यात असल्यामुळे तिकीट दरात एक रुपया वाढ करण्याचा निर्णय सप्टेंबर २०२१ मध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा दरवाढीचा प्रस्ताव आला आहे. या दरवाढीचा सर्वात जास्त फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.