PMP Bus : नवीन वर्षात पीएमपीच्या ताफ्यात येणार नव्या 1600 बस

1148
PMP Bus अचानक बंद पडण्याचे प्रमाण घटले

पीएमपीच्या ताफ्यात नवीन वर्षात 1600 बस येणार आहेत. यातील 200 स्वमालकीच्या सीएनजी बस दोन्ही महापालिका घेऊन देणार आहेत. तर 400 सीएनजी बस पीएमपी भाडेतत्त्वावर घेणार असून, केंद्राच्या पीएम ई-ड्राईव्ह योजनेतून 1 हजार बस मिळण्याची शक्यता आहे. अशा एकूण 1600 नव्या बस पीएमपीच्या ताफ्यात नवीन वर्षात दाखल होतील, यामुळे पुणेकर प्रवाशांची प्रवासासाठी होणारी ओढाताण काही प्रमाणात का होईना, कमी होणार आहे. (PMP Bus)

(हेही वाचा – Infant Mortality Rate : राज्यात घटले बालमृत्यू; शासकीय आरोग्य केंद्रातील प्रसुतींचे प्रमाण वाढले)

पीएमपीच्या ताफ्यात 1 हजार 880 बस आहेत, यातील 1 हजार 491 बस दररोज संचलनाकरिता मार्गावर असतात. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएची लोकसंख्या पाहता, त्यांच्याकरिता दररोज मार्गावर धावणार्‍या 1491 बस या अपुर्‍या आहेत. पीएमपीच्या ताफ्यातील अपुर्‍या बसमुळे प्रवाशांची प्रवास करताना दररोज ओढाताण होते. त्यांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. बसमध्ये प्रवाशांना बसायला जागाच मिळत नसून, बस प्रवाशांच्या गर्दीने तुडुंब भरून जात आहेत. (PMP Bus)

(हेही वाचा – New Year : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून काय होणार आहेत बदल? जाणून घ्या…)

यासोबतच बससाठी प्रवाशांना वेटिंग करावे लागत आहे. त्यामुळे पीएमपी, दोन्ही महानगरपालिका यांच्याकडून नवीन बस खरेदीचे नियोजन आहे. यासोबतच केंद्र शासनाच्या पीएम ई-ड्राईव्ह या योजनेच्या माध्यमातून 1 हजार नवीन बस मिळवून देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला आहे. त्यासाठी पुण्याचे खासदार तथा केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पाठपुरावा करत आहेत. (PMP Bus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.