PMPML Bus : ५ रुपयांत ५ किलोमीटर प्रवास योजना बंद

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएमएलच्या डेपोपासून पाच किलोमीटरच्या अंतरासाठी ५ रुपये तिकीट आकारणी करण्यात येत होती परंतु ही योजना आता बंद झाली असून, या मार्गांवर नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे टप्प्यानुसार प्रवाशांकडून पाच ते दहा रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा बदल पुणे पीएमपीएमएलच्या २८ मार्गांवर होणार आहे.

( हेही वाचा : नवाब मलिकांचा जामीन फेटाळला; पुन्हा कोठडीत १४ दिवसांची वाढ )

पीएमपीएमएलचे आर्थिक नुकसान

पीएमपीएमएलने २५ ऑक्टोबर २०२० पासून पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये तिकीट आकारणी सुरू केली होती. त्यासाठी ५६ मार्ग निश्चित करण्यात आले होते. परंतु, काही मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे ते मार्ग बंद करून २८ मार्गांवर ही सेवा सुरू ठेवण्यात आली होती. परंतु, बस वाहतुकीसाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा विचार करता ५ किलोमीटर अंतरासाठी ५ रुपये तिकिट आकारणीमुळे पीएमपीएमएलचे आर्थिक नुकसान होत होते. त्यातून संचलनातील तूटही वाढत होती. त्यामुळे या २८ मार्गांवर १९ फेब्रुवारीपासून नेहमीच्या दराने तिकीट आकारणी करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here