पुणे तिथे काय उणे! PMPML बसचा थेट Google सोबत करार; प्रवाशांना मिळणार ‘या’ नव्या सुविधा

114

पीएमपी बसचे ट्रॅकिंग व्यवस्थित होण्यासाठी सगळ्या बसचे लाईव्ह लोकेशन पीएमपीच्या कंट्रोल रुमला मिळावे या हेतूने गुगल सोबत करार करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला आता संचालक मंडळाने सुद्धा मान्यता दिली आहे. त्यामुळे पुण्याच्या प्रवाशांना आता बसचे लोकेशन थेट गुगल मॅपवर मिळेल.

( हेही वाचा : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! प्रिपेड टॅक्सीचे भाडे वाढले; जाणून घ्या नवे दर…)

पुण्यात सार्वजनिक वाहतुकीने अर्थात पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून आता तुम्हाला बस लाईव्ह ट्रॅक करता येणार आहे. बस वाहतूककोंडीत अडकली आहे, बसला येण्यास उशीर लागेल. या सर्व बाबींचीही माहिती प्रवाशांना समजणार आहे. कारण, पीएमपीएमएल व गुगलचा करार झाला असून दिवाळीपासून या नव्या सेवेला सुरवात होणार आहे. यासाठी पीएमपीने प्रायोगिक तत्त्वावर २० बस व २० मार्गांची निवड केली आहे. चार महिने गुगल याची चाचणी घेईल. त्यानंतर सर्व बस मार्गांवर अंमलबजावणी केली जाईल.

प्रवाशांना मोबाईलवर मिळणार माहिती

यापूर्वी पीएमपीने बसचे लाइव्ह लोकेशन समजण्यासाठी ‘आयटीएमएस’चा प्रयोग केला. मात्र त्याची माहिती केवळ पीएमपी प्रशासनाला कळत असे. प्रवाशांना माहिती मिळत नव्हती. आता मात्र गुगल ही सेवा मोफत देणार आहे. गुगल मॅप ॲपमध्ये आपण प्रवास सुरु करण्याच्या व पोहचण्याचे ठिकाणाची माहिती देतो, तसाच उल्लेख बसच्या लाइव्ह लोकेशनसाठी करायचा आहे. उदा. गुगल मॅपमध्ये स्वारगेट ते कात्रज असे टाइप केल्यावर त्या मार्गावर धावणाऱ्या बस, त्यांचे लाइव्ह लोकेशन, त्यांच्या वेळा याबाबतची सर्व माहिती प्रवाशांना मोबाईलवर मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.