पुणे रेल्वे स्थानकावर बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी पीएमपीची (PMPML) बससेवा आज बुधवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील लेन क्रमांक 4 येथून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
(हेही वाचा – पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! या मार्गावरही धावणार PMPML बस)
कोरोना महामारीपासून पीएमपी बसची येथील सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यातील काही प्रवाशांना रिक्षा तसेच खासगी प्रवासी वाहनांचा वापर करावा लागत होता. अनेकदा या प्रवाशांकडून जादा भाडे वसूल केले जात होते. परंतु, आता पीएमपीची ही बससेवा पुन्हा सुरू होत असल्याने या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुण्यातील 8 मार्गांवर ही बससेवा असणार आहे, असे प्रशासानाकडून सांगण्यात आले.
या मार्गांवर धावणार बस
- पुणे स्टेशन ते वडगाव-वेणूताई कॉलेज
- पुणे स्टेशन ते एनडीए गेट नं. 10
- पुणे स्टेशन ते अप्पर डेपो
- पुणे स्टेशन ते हिंजवडी (बीआरटी)
- मनपा भवन ते डी. वाय. पाटील कॉलेज (बीआरटी)
- पुणे स्टेशन ते खराडी, ढोले पाटील कॉलेज
- पुणे स्टेशन ते चिंचवडगाव (बीआरटी)
- मनपा भवन ते डायमंड वॉटर पार्क दादाची पडळ