धावत्या पीएमपीएमएल बसने अचानक घेतला पेट

सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी नाही

105

धावत्या पीएमपीएमएल बसने अचानक पेट घेतला. बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन धूर निघाला आणि लगेच बसने पेट घेतला. ही घटना बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास दापोडी पिंपळे गुरव नदीवरील पूल महाराजा हॉटेल शेजारी पिंपळे गुरव येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. परंतु पीएमपीएमएल वारंवार लागणा-या आगीच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेता प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रसंगावधान राखले

पीएमपीएमएल बस (एम एच 12 / एच बी 1438) ही सीएनजी मॉडेल बस दापोडी पिंपळे गुरव या मार्गावरून जात होती. सकाळी पावणे अकरा वाजता दापोडी पिंपळे गुरव नदीवरील पुलाजवळ बस आली असता अचानक बसने पेट घेतला. प्रसंगावधान राखत बसमधील प्रवासी आणि चालक, वाहक खाली उतरले.

मोठा अनर्थ टळला

घटनेची माहिती मिळताच पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र व रहाटणी उप अग्निशमन केंद्र येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी पाणी मारून बसची आग विझवली. अग्निशमन दलाने त्वरित आग विझवल्याने बसचा पाठीमागील भाग व सीएनजी फ्यूल टॅंक आगीपासून वाचविण्यात यश मिळाले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.