PMPML च्या ई-बस डेपोचे शुक्रवारी उद्घाटन, 90 ई-बसेस सेवेत होणार दाखल

161

पीएमपीएमएल’च्या पुणे स्टेशन येथील ई-बस डेपोचे येत्या शुक्रवारी (दि.2 सप्टेंबर) उद्घाटन होणार असून यावेळी 90 ई-बसेसचा लोकार्पण सोहळाही होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

(हेही वाचा – गौतम अदानी जगातील पहिल्या 3 श्रीमंतांमध्ये स्थान मिळवणारे पहिले आशियाई)

कोणत्या मार्गावर धावणार ई-बसेस

या पुणे स्टेशन ई-बस डेपोतून 15 विविध मार्गांचे 90 शेड्यूलव्दारे नियोजन करण्यात आले आहे. या ई-बसेस हिंजवडी माण फेज 3, गोखलेनगर, आळंदी, विश्रांतवाडी, लोहगाव, मांजरी बु., रांजणगाव कारेगाव, खराडी, विमाननगर, कोंढवा खुर्द, साळुंके विहार, चिंचवड गाव, शेवाळेवाडी या मार्गांवर धावणार आहेत. पुणे स्टेशन डेपोमध्ये बसेसच्या चार्जिंगसाठी 45 AC/DC चार्जर बसविलेले आहेत. तसेच प्रति दिन प्रति बस 225 कि.मी. प्रमाणे बस संचलनाचे नियोजन असणार आहे.

ई-बसमध्ये मिळणार या सुविधा

तसेच यावेळी केंद्र शासनाच्या फेम-2 योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या 150 ई-बसेस पैकी 90 ई-बसेसचा लोकार्पण सोहळा होणार आहे. (E-bus depot inauguration) केंद्र शासनाच्या फेम-2 योजनअंतर्गत प्राप्त होणाऱ्या 150 ई-बसेससाठी प्रति बस 55 लाख रूपये प्रमाणे सबसिडी केंद्र सरकारने दिलेली असून या ई-बसेस जीसीसी तत्वावर चालविल्या जाणार आहेत. या ई-बसची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये 12 मी. लांबी, आसन क्षमता 33, संपूर्ण वातानुकुलित, दिव्यांगांसाठी खास सुविधा आयटीएमएस, मोबाईल चार्जिंग सुविधा अशी आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.