PMPML: पीएमपीएमएलच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगसाठी वीजच अपुरी, प्रवाशांमध्ये नाराजी

पुणे शहरात आधीच इलेक्ट्रिक बसेसची संख्या कमी असताना, PMPMLच्या अनेक इलेक्ट्रिक बसेस या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे बंद पडल्या आहेत. त्यामुळेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड(PMPML)कडून जवळपास 60 इलेक्ट्रिक बसेस या डेपोमध्ये पार्क करण्यात आल्या आहेत.

सध्या सर्वच महत्वाच्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस मोठ्या प्रमाणावर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बसेसना प्रवाशांकडून देखील चांगली पसंती मिळत आहे. पण पीएमपीएलच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसेस या पायाभूत सुविधांच्या अभावी पडून आहेत.

बसेस चार्ज करण्यास वीज अपुरी

इलेक्ट्रिक बसेस चार्ज करण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध नसल्यामुळे पीएमपीएमएलच्या अनेक इलेक्ट्रिक बसेस या गेल्या चार महिन्यांपासून धूळ खात पडल्याचे एका अधिका-याने सांगितले आहे. वाघोली येथे PMPML कडून 105 इलेक्ट्रिक बसेसना चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन बांधण्यात आले आहे. मात्र, या चार्जिंग स्टेशनची क्षमता ही केवळ 54 बसेस चार्ज करण्याइतकीच आहे, असेही अधिका-यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचाः ‘…तर बाजारात,ट्रेनमध्ये रोज शेकड्यांनी विनयभंग होत असतील’, पतीवरील आरोपांनंतर आव्हाडांच्या पत्नीचे मोठे विधान)

190 बसेस येणार पीएमपीएलच्या ताफ्यात

मात्र, पुढील महिन्यापर्यंत सर्व चार्जिंग पॉइंट्ससाठी वीज उपलब्ध करण्यात येईल. तसेच चार्जिंगसाठी लागणा-या सर्व पायाभूत सुविधा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर अंदाजे 190 इलेक्ट्रिक बसेस PMPMLच्या ताफ्यात येतील, असे देखील या अधिका-याने सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here