PMPML च्या ई- बस डेपोतचं उभ्या; चार्जिंगअभावी प्रवाशांची गैरसोय

157

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला (पीएमपीएमएल) पुण्यात चांगला महसूल प्राप्त होत असताना, दुसरीकडे इलेक्ट्रिक बसेस (ई-बस) चार्जिंगअभावी डेपोतचं उभ्या आहेत.

( हेही वाचा : व्हॉट्सअ‍ॅपवर एका क्लिकवर मिळणार LIC च्या सुविधा! कसे कराल रजिस्ट्रेशन? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ई-डेपोचे उद्घाटन केले होते त्यानंतर PMPML ताफ्यात आणखी 20 ई-बस जोडल्या गेल्या होत्या. परंतु संस्थेकडे पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत, यामुळे ब-याच मार्गावरील बसेस बंद आहेत.

केंद्र सरकारच्या फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (FAME) प्रकल्पांतर्गत एकूण 500 ई-बसपैकी 150 ई-बस टप्प्याटप्प्याने पीएमपीएमएलकडे येत आहेत. या बसेस 12 वर्षांच्या कराराच्या आधारवर घेण्यात येणार आहेत. उर्वरित 350 ई-बस पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही महानगरपालिका (अनुक्रमे PMC आणि PCMC) एकूण खर्चाच्या कराराच्या आधारावर घेतील. या ई-बस भेकराईनगर, वाघोली, निगडी, पुणे रेल्वे स्थानक, बाणेर आणि भोसरीसह विविध बस डेपोमध्ये वितरीत करण्यात आल्या आहेत.

या बसेसमध्ये चार्जिंगसाठी पुरेशी वीज किंवा पायाभूत सुविधा नसल्यामुळे प्रवासी त्यांचा लाभ घेऊ शकत नाहीत. सध्या, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अशा 100 हून अधिक ई-बस डेपोत उभ्या आहेत. या गाड्या दैनंदिन सेवेमध्ये वापरल्या जात नाहीत. “ई-बसच्या चार्जिंग सुविधा आणि पायाभूत सुविधांबाबत काही समस्या आहेत परंतु आम्ही त्यावर काम करत आहोत आणि लवकरच, बहुतांश ई-बस रस्त्यावर येतील. आमचे अधिकारी महावितरणशी सतत बोलणी करत आहेत आणि जिथे वीजपुरवठ्याबाबत काही कमतरता किंवा समस्या असेल तिथे ते सोडवल्या जात आहेत, असे पीएमपीएमएलच्या सह व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पवार यांनी सांगितले.

तर महावितरणने पीएमपीएमएलने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भरत पवार म्हणाले, “पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी महावितरणला चुकीची माहिती दिली आहे की आम्ही ई-बस चार्जिंग स्टेशनला आवश्यक पुरवठा करत नाही.” महावितरणने पीएमपीएमएलला त्यांच्या सर्व ई-डेपोंना वीज पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे, परंतु पीएमपीएमएलचे पायाभूत काम प्रलंबित आहे ज्यामुळे वीज पुरवठा सोडण्यास विलंब होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.