PMPML for Women: महिलांसाठी ‘या’ 19 मार्गांवर धावणार विशेष PMPML बस

महिलांचा PMPML बसमधून होणारा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. कारण पीएमपी प्रशासनाने महिला प्रवाशांसाठी महिला विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, 28 नोव्हेंबरपासून 19 मार्गांवर 24 बस धावणार आहेत. या बसमध्ये महिला वाहकांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य वाहतूक व्यवस्थापन दत्तात्रेय झेंडे यांनी दिली.

पुणे महानगर परिवहन महांडळाकडून पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातील महिला प्रवाशांसाठी सकाळी व सायंकाळी गर्दीच्यावेळी या बस सोडण्यात येणार आहेत. उर्वरित वेळी या बसमधून पुरुष व महिला प्रवास करु शकतील.

( हेही वाचा: चंद्रावर लवकरच मानवाची वस्ती; नासाने केला ‘हा’ मोठा दावा )

‘या’ मार्गांवर धावणार महिला बस

 • स्वारगेट ते येवलेवाडी
 • स्वारगेट ते हडपसर
 • अ.ब. चौक ते सांगवी
 • म.न.पा भवन ते लोहगाव
 • कोथरुड डेपो ते विश्रांतवाडी
 • कात्रज ते कोथरुड डेपो
 • हडपसर ते वारजे माळवाडी
 • भेकराईनगर ते मनपा भवन
 • हडपसर ते वाघोली
 • अप्पर डेपो ते स्वारगेट
 • अप्पर डेपो ते पुणे स्टेशन
 • पुणे स्टेशन ते लोहगाव
 • मनपा भवन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन
 • निगडी ते भोसरी
 • तेजस्विनी निगडी ते हिंजवाडी
 • चिंचवडगाव ते भोसरी
 • चिखली ते डांगे चौक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here