अन्यथा बसमधून खाली उतरा…PMPML महामंडळाचा मोठा निर्णय!

129

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएल (PMPML) ने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण पूर्ण न झालेल्या प्रवाशांना बसमध्ये परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातील अनेक प्रवाशांना त्यांच्याकडे पूर्ण लसीकरण झाल्याचा पुरावा नसल्यामुळे बसमध्ये प्रवेश नाकारण्यात आला असे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी स्पष्ट केले. यामुळे पुण्यात सध्या केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच पीएमपीएमएल बसमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जात आहे.

( हेही वाचा : …तर मुलींना २१व्या वर्षी मिळणार ५ लाख रूपये! जाणून घ्या ‘या’ योजनेविषयी )

प्रवेश नाकारला जातो

प्रवाशांना तिकीट देताना कंडक्टरकडून लसीकरण प्रमाणपत्राची (Universal Pass) तपासणी होते. जर, एखाद्या प्रवाशाचे संपूर्ण लसीकरण झालेले नसेल तर, संबंधित प्रवाशाला बसमधून खाली उतरण्यास सांगून प्रवेश नाकारला जातो असे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी स्पष्ट केले. यामुळे महामंडळाचे निश्चितपणे आर्थिक नुकसान होईल, आधीच कोरोनामुळे पीएमपीएमएल महामंडळ तोट्यात आहे व या नव्या नियमांमुळे बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दोन लाखांहून कमी झाली आहे. तरीही सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे असेही ते म्हणाले.

( हेही वाचा : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती ‘या’ दिग्गजांनी केले अभिवादन! )

पीएमपी प्रवासी मंचाचा विरोध

प्रवाशांचे हक्क जपणाऱ्या पुण्यातील पीएमपी प्रवासी मंचच्या जुगन राठी यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. “पीएमपीएमएलने प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. बरेच प्रवासी गरीब आणि निरक्षर आहेत आणि त्यांना कदाचित सर्व कोरोना विषयक उपायांची माहिती नसेल म्हणून, प्रत्येकाला डिबोर्ड करण्याऐवजी, ज्या लोकांना दृश्यमान लक्षणे दिसतात त्यांना खाली उतरण्यास सांगितले पाहिजे,” असे राठी म्हणाले. प्रवाशांच्या अधिक सुरक्षेसाठी पीएमपीएमएल बसेसची संख्या वाढवणे किंवा प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग यांसारख्या उपाययोजना महामंडळ करू शकते. हा सोयीस्कर मार्गही राठी यांनी सुचवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.