PMPML new route : ‘या’ नवीन मार्गांवर PMPML बस धावणार

PMPML अर्थात पुणे महापालिका परिवहन महामंडळाचा विस्तार दिवसागणिक होत आहे. त्यामुळेच पुणे शहर आणि ग्रामीण याना जोडणारी PMPML सेवा ही दुवा बनत चालली आहे. गुरुवार, २४ नोव्हेंबर २०२२ पासून कोथरूड डेपो ते चतुश्रुंगी या मार्गावर बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रायोगिक तत्वावर हा बस मार्ग सुरु करण्यात येणार आहे.

कधी सुटणार बस? 

कोथरूड डेपोवरून बस सुटण्याची वेळ

  • सकाळी ८.००, ८.४०, ९.२०, १०.००, १०.४०, ११.२०
  • दुपारी ४.००, ४.४०, ५.२०
  • रात्री ६.००, ६.४०, ७.२०

चतुश्रुंगीवरून बस सुटण्याची वेळ

  • सकाळी ८.४०, ९. २०, १०.००, १०. ४०, ११.२०
  • दुपारी १२.००, ४.४०, ५.२०
  • रात्री ६.००, ६.४०, ७.२०, ८.००

सदर बस मार्ग सुरु होत असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा उपलब्ध होणार आहे, (PMPML new route) तरी जास्तीत-जास्त प्रवासी नागरिकांनी या बस सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे. प्रवासी संख्या व उत्पन्नात वाढ झाल्यास या मार्गांवर आणखी बसेस वाढविण्यात येतील.

मार्ग क्र. एन – ४ डेक्कन जिमखाना ते गोखलेनगर या बस मार्गात बदल

24 नोव्हेंबर 2022 पासून मार्ग क्र. एन – 4 डेक्कन जिमखाना ते गोखलेनगर या बस मार्गामध्ये बदल करून डेक्कन, भांडारकर रोड, सिंबायोसिस कॉलेज, शेती महामंडळ, कुसाळकर पुतळा, सेनापती बापट रोड यामार्गे संचलनात राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here