PMPML बसमध्ये दैनिक पास सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

134

पुणे महापालिका कार्यक्षेत्राच्या बाहेर म्हणजेच तळेगाव ढमढेरे, रांजणगाव एमआयडीसी आणि इतर दूर अंतराच्या मार्गावर ‘पीएमपीएमएल’च्या बसेस दैनंदिन सेवा देतात. परंतु पुणे महापालिका प्रशासनाने ग्रामीण भागातील प्रवाशांची दैनिक पासची सुविधा बंद करून फक्त पुणे शहर कार्यक्षेत्रात पासची सुविधा सुरू ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

( हेही वाचा : लालपरीतून आरामदायी प्रवास! प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत चांगल्या सुविधा देण्यासाठी पंचसूत्री)

प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

पासची सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवासी करत आहेत. बसची वारंवारता आणि चांगल्या सुविधेमुळे पुणे शहरात दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाला मोठा आर्थिक फायदा होतो. पूर्वी सर्व मार्गांवरील बस प्रवाशांना ७० रुपये दैनिक पासची सुविधा होती. आता तळेगाव ढमढेरे येथून बसने पुण्याला जाण्यासाठी प्रवास करायचा असेल, तर वाघोलीपर्यंत पासऐवजी रोख पैसे देऊन तिकीट काढावे लागत असून, वाघोलीपासून पुढे पुण्यात जाण्यासाठी त्याच बसमध्ये पास घेऊन पुढील प्रवास करावा लागत आहे. पासची सुविधा बंद झाल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, व्यापारी व इतर सर्व सामान्य प्रवाशांची गैरसोय होऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.