पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुणे शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी (PMPML) प्रशासनाने पुणे स्टेशन ते डिफेन्स कॉलनी (गंगाधाम मार्केटयार्ड) या मार्गावर आज, सोमवारपासून बस सेवा सुरू केली आहे. पीएमपीची बस सेवा सकाळी आणि संध्याकाळी या वेळेत दिवसांतून दोन फेऱ्या या मार्गावर धावणार आहे.
असा असणार बसचा मार्ग
या बसचा मार्ग पुणे स्टेशन, कलेक्टर कचेरी, जी.पी.ओ, बॉम्बे गॅरेज, जुना पुलगेट, महात्मा गांधी स्टॅण्ड, मिलिटरी हॉस्पिटल, वानवडी, वानवडी बाजार, शिंदे छत्री, नेताजीनगर, लुल्लानगर (मार्केट यार्ड रोड), माउंट कार्मेल स्कूल, असा असणार आहे. डिफेन्स कॉलनीवरून सकाळी ९ वाजता ही बस सुटणार आहे. तर पुणे स्टेशनवरून संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी बस सुटणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे.
(हेही वाचा – पुणेकरांनो! बेकायदा बाईक, टॅक्सी विरोधात रिक्षा चालक आक्रमक; पुकारला बेमुदत संप)
पुणे स्टेशन ते डिफेन्स कॉलनी (गंगाधाम मार्केटयार्ड) या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात येत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित सेवा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे, तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलतर्फे करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community