PM’s Security Breach Punjab : पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; ७ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर ११ महिन्यांनी ‘ही’ कारवाई

Police Suspended in Punjab : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Assembly Elections) रॅलीत सहभागी होण्यासाठी पंजाब दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांच्या सुरक्षेत मोठा हलगर्जीपणा झाला होता. या प्रकरणी वर्षभरानंतर एकूण सात पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

137
PM's Security Breach Punjab : पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; ७ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर ११ महिन्यांनी 'ही' कारवाई
PM's Security Breach Punjab : पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; ७ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर ११ महिन्यांनी 'ही' कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी पंजाब दौऱ्यावर होते. ते तेथे विधानसभा निवडणुकीच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक अथवा हलगर्जीपणा झाला होती. त्या वेळी कर्तव्यात चूक करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. (police suspended in punjab)

वर्षभरानंतर कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Assembly Elections) रॅलीत सहभागी होण्यासाठी पंजाब दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांच्या सुरक्षेत मोठा हलगर्जीपणा झाला होता. या प्रकरणी वर्षभरानंतर एकूण सात पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. फिरोजपूर (Ferozepur) जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि दोन डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. गेल्या वर्षी 5 जानेवारीला ही घटना घडली होता.

(हेही वाचा – Air Pollution: हवा प्रदूषण रोखण्यासाठी कारवाई, पुण्यातील ६७ बांधकाम व्यावसायिकांना नोटिस)

निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पंजाब सिव्हिल सेवा (दंड आणि अपील) नियम, 1970 च्या नियम 8 नुसार, कारवाईला सामोरे जावे लागेल. या नियमांतर्गत पदोन्नती रोखण्यापासून ते सेवेतून बडतर्फ करेपर्यंत शिक्षा होऊ शकते.

पंतप्रधानांच्या प्रवासात शेवटच्या क्षणी बदल झाल्याचा काँग्रेसचा आरोप

या वेळी, शेतकरी आंदोलकांनी (Farmers protest) केलेल्या नाकाबंदीमुळे पंतप्रधानांचा ताफा सुमारे 20 मिनिटे उड्डाणपुलावरच अडकून राहिला होता. या हलगर्जीपणाबद्दल भाजप नेत्यांनी तत्कालीन चरणजीत सिंह चन्नी सरकारला लक्ष्य केले होते. या प्रकरणी स्पष्टीकरण देतांना पंतप्रधानांच्या प्रवासात शेवटच्या क्षणी बदल झाल्याचे काँग्रेसने (congress) म्हटले होते. या प्रकरणी, तत्कालीन फिरोजपूर पोलीस प्रमुख तथा आता भटिंडाचे एसपी गुरबिंदर सिंग यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते.

(हेही वाचा – MNS Aandolan : मराठी पाट्या न लावल्याने मनसेने ठाण्यातील दुकानाच्या पाट्यांना फासलं काळ)

गृहविभाग आणि पंजाब सरकार दोन्ही स्तरांवर कारवाई

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करणासाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीने पंजाब सरकारच्या काही अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने आता या चुकीबद्दल सात पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

याशिवाय राज्याच्या गृहविभागाच्या आदेशानुसार डीएसपी (DSP) दर्जाचे अधिकारी पारसन सिंग आणि जगदीश कुमार, पोलीस निरीक्षक जतिंदर सिंग आणि बलविंदर सिंग, उपनिरीक्षक जसवंत सिंग आणि सहायक उपनिरीक्षक रमेश कुमार यांनाही निलंबित करण्यात आले आहे. (PM’s Security Breach Punjab)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.