महिला सुरक्षेसाठी प्रशासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. अलिकडेच पीएमटीच्या बसमध्ये महिलांसाठी सुरू केलेल्या स्वच्छतागृहाच्या ११ प्रकल्पास स्थायी समितीने मान्यता दिली. पीएमटीच्या वापरात नसणाऱ्या बसचे रूपांतर महिला स्वच्छतागृहात करण्यात आले आहे. याचा स्थानिक महिलांना नक्कीच फायदा होणार आहे. यासाठी अल्पदरात शुल्क आकारण्यात येईल.
प्रती महिला पाच रुपये शुल्क
या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन, टॉयलेट सिट सॅनिटायझर, हॅन्ड सॅनिटायझर, जनजागृतीसाठी दूरचित्रवाणी संच इत्यादी सुविधा असणार आहेत. या बसमध्ये टॉयलेट आणि वॉश बेसिन हे एका भागात तर दुसऱ्या विभागात चहा, कॉफी, पिण्याचे पाणी, शीतपेय यांची विक्री याची सुविधा असेल. यामध्ये प्रती महिला पाच रुपये शुल्क घेतले जाणार आहे. पीएमटीच्या वापरात नसलेल्या बसचे रंगरुप बदलून त्यांचे रुपांतर स्वच्छचागृहांमध्ये केले जाणार आहे.
( हेही वाचा : कोकणवासीयांची व्यथा! रेल्वे दारासमोरुन जाते, पण… )
या अकरा ठिकाणी असेल ही सुविधा
सिंध सोसायटी औंध, संभाजी पार्क, सिमला ऑफीस, शनिवारवाडा, ग्रीन पार्क हॉटेल बाणेर, आनंद नगर सिंहगड रस्ता, छत्रपती शिवाजी उद्यान बोपोडी, आरटीओ फुले नगर, लोहगाव बसस्टॉप, संविधान चौक विश्रांतवाडी या अकरा ठिकाणी प्रशासनकडून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community