Pneumonia Outbreak In China : चीनमध्ये मुलांच्या श्वसनविकारांत वाढ; आरोग्य मंत्रालयाचे यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

Union Ministry of Health : देशात सध्या सुरू असलेली इन्फ्लूएन्झाची (Influenza) साथ आणि हिवाळ्याच्या ऋतूमुळे, श्वसनविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, मात्र कोणतीही धास्ती बाळगण्याची गरज नसल्याचे सरकारने सूचित केले आहे.

177
Pneumonia Outbreak In China : चीनमध्ये मुलांच्या श्वसनविकारांत वाढ; आरोग्य मंत्रालयाचे यंत्रणांना सतर्कतेचे आदेश
Pneumonia Outbreak In China : चीनमध्ये मुलांच्या श्वसनविकारांत वाढ; आरोग्य मंत्रालयाचे यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

उत्तर चीनमधील (North China) मुलांमध्ये श्वसनविकारांत वाढ झाल्याचे अहवाल गेल्या काही आठवड्यांत प्रसिद्ध झाले आहेत. (Pneumonia Outbreak In China) त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) पुरेशी सावधगिरी म्हणून श्वसनविकारांविरुद्धच्या सज्जतेच्या उपाययोजनांचा कृतिशील आढावा घेतला आहे. देशात सध्या सुरू असलेली इन्फ्लूएन्झाची (Influenza) साथ आणि हिवाळ्याच्या ऋतूमुळे, श्वसनविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, मात्र कोणतीही धास्ती बाळगण्याची गरज नसल्याचेही सरकारने सूचित केले आहे. (Pneumonia Outbreak In China)

(हेही वाचा – Manoj Jarange : मनोज जरांगे यांचे भुजबळांना प्रत्युत्तर; म्हणाले…)

उपाययोजनांचा ताबडतोब आढावा घ्या – केंद्रीय आरोग्य सचिव

केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय सज्जतेबाबतच्या उपाययोजनांचा ताबडतोब आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये मनुष्यबळाची उपलब्धता, रुग्णालयातील खाटा, इन्फ्लूएंझासाठी औषधे आणि लस, वैद्यकीय ऑक्सिजन, प्रतिजैविके, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे, चाचणी संच आणि विविध वैद्यकीय उपचारात्मक रसायने, ऑक्सिजन निर्मितीचे प्लान्ट आणि व्हेंटिलेटर्सची (जीवरक्षक प्रणाली) कार्यक्षमता, आरोग्य सुविधांमधील संसर्ग नियंत्रण पद्धती, या सर्व बाबींची मोठ्या प्रमाणात उपलब्धता, यांचा समावेश आहे.

लहान मुले आणि नवजात अर्भके यांची विशेष काळजी घ्या

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना ‘कोविड-19 च्या अनुषंगाने, परिस्थितीवर लक्ष ठेवण्याबाबत या वर्षाच्या सुरुवातीलाच देण्यात आलेली सुधारित देखरेख धोरणांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यात इन्फ्लूएन्झा (ILI) आणि तीव्र स्वरूपाचे श्वसन आजार (SARI), या सारख्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या श्वसनरोगाच्या कारणांच्या देखरेखीची तरतूद आहे.

(हेही वाचा – KCR : निवडणुकीच्या तोंडावर BRS कडून मुस्लिमांचे पराकोटीचे तुष्टीकरण; स्वतंत्र आयटी पार्क, पेन्शन आणि मोफत वीज)

या संसर्गांच्या वाढीवर, एकात्मिक रोग देखरेख प्रकल्पांचे (IDSP), जिल्हा आणि राज्य विभाग, बारकाईने लक्ष ठेवून आहेत की नाही, याची खातरजमा करण्याची सूचनाही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे. यात लहान मुले आणि नवजात अर्भके यांची विशेष काळजी घेण्याचा समावेश आहे.

तपशील पोर्टलवर टाकणे आवश्यक

वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांसह सार्वजनिक आरोग्य संस्थांनी (Institute of Public Health) ILI/SARI च्या माहितीचा तपशील, IDSP- IHIP पोर्टलवर टाकणे आवश्यक आहे. SARI ग्रस्त रुग्णांच्या (विशेषत: लहान मुले आणि किशोरवयीन मुले) नाक आणि घशातील स्त्रावांचे नमुने श्वसन विकार जनकांच्या चाचणीसाठी, राज्यांमध्ये असलेल्या व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यास, राज्यांना सांगितले आहे.

(हेही वाचा – PM – Mann Ki Baat : हा दिवस विसरू शकत नाही; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी केले २६/११ च्या हुतात्म्यांचे स्मरण)

3 नोव्हेंबर रोजी चिनी माध्यमांनी शाळांमध्ये एक गूढ आजार पसरल्याची चर्चा होती. यामुळे, चीनची राजधानी बीजिंगमधील आणि 500 ​​मैलांच्या (सुमारे 800 किमी) परिघात सर्व रुग्णालये रुग्णांनी भरलेली होती. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

1200 रुग्ण आपत्कालीन स्थितीत दाखल

बाधित मुलांमध्ये फुफ्फुसात जळजळ, खूप ताप, खोकला आणि सर्दी यांसारखी लक्षणे दिसून येतात. अल जझीराच्या म्हणण्यानुसार, बीजिंगमधील रुग्णालयात दररोज या आजाराने ग्रस्त सुमारे 1200 रुग्ण आपत्कालीन स्थितीत दाखल होत आहेत.

प्रो-मेड नावाच्या प्लॅटफॉर्मने चीनमधील न्यूमोनियाबाबत जगभरातील अलर्ट जारी केला आहे. हे व्यासपीठ मानव आणि प्राण्यांमध्ये पसरणाऱ्या रोगांची माहिती ठेवते. प्रो-मेडने डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाबाबत अलर्टही जारी केला होता. (Pneumonia Outbreak In China)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.