मुलुंड केळकर स्मशानभूमीत पीएनजीची गॅसवाहिनी!

65

मुलुंड येथील केळकर स्मशानभूमीत आता नविन पीएनजी गॅस वाहिनी बसवण्यात येणार असून या नवीन गॅस वाहिनीसह या स्मशानभूमीचे नुतनीकरण आणि सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या नुतनीकरण व सुशोभिकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. अंधेरी रेल्वे स्थानकामधील नवीन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेतील नोंदणीकृत असलेल्या या कंत्राटदाराने महापालिकेच्या केलेल्या कामांचा अनुभव देण्याऐवजी या कंत्राटदाराने पश्चिम रेल्वेच्या इमारतीचे बांधकाम केल्याचा अनुभव दिला आहे. त्यामुळे पीएनजीवरील गॅस वाहिनीच्या उभारणीचा अनुभव नसलेल्या कंत्राटदाराची केळकर स्मशानभूमीच्या नुतनीकरणासह सुशोभिकरणासाठी नेमणूक केल्याने प्रत्यक्षात या कामांबाबत शंका उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : देशातंर्गत २०लाख, तर विदेशातील शिक्षणासाठी मिळणार ३०लाख कर्ज; विद्यार्थ्यांसाठी सरकारची विशेष योजना!)

मुलुंड केळकर स्मशानभूमीतील इमारतींचे आवश्यक लादीकरण, दरवाजे व खिडक्यांची दुरुस्ती तसेच नवीन बसवणे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती, पायवाटांवर लादीकरण व शेड उभारणे, पाणी पुरवठा, सांडपाणी व पावसाळी पाणी वाहून नेणारे पाईप बसवणे, नवीन पीएनजी गॅसवाहिनी बसवणे, ख्रिश्चन स्मशानभूमीमध्ये आरसीसी दफन खड्डे बांधणे, पायावाटांच्या कडेला पॅरापेट भिंत बांधणे, वूडशेडजवळ व्यासपीठ व बसण्याची व्यवस्था करण्यासाठी बांधकाम निविदा मागवली होती. या निविदेमध्ये के.के. इंजिनिअरींग ही कंपनी पात्र ठरली आहे. यासाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

पात्र ठरलेली कंपनी ही महापालिकेचे नोंदणीकृत कंत्राटदार असल्याचे प्रशासनाने दाखवले असले तरी प्रत्यक्षात कंत्राटदाराने केलेल्या कामांच्या अनुभवांमध्ये पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकाच्या केलेले काम दर्शवण्यात आले आहे. त्यामुळे नक्की या कंत्राटदाराने महापालिकेचे कोणते काम केले असा सवाल उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.