कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या Vishal Gawali ची तळोजा कारागृहात आत्महत्या

106

कल्याणमधील (Kalyan) अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीने तळोजा मध्यवर्ती कारागृहात (Taloja Central Jail) आत्महत्या केली आहे. आज रविवार,१३ च्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी (Vishal Gawali) याने मध्यवर्ती कारागृहातील बाथरुममध्ये आत्महत्या केली असल्याचं समोर आलं असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदन साठी जे.जे. रुग्णालयात (J.J. Hospital) पाठवण्यात आला आहे.

(हेही वाचा – Myanmar Earthquake : म्यानमार पुन्हा एकदा जोरदार भूकंपाने हादरलं !)

कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या (Kolsewadi Police Station) हद्दीत विशाल गवळीने एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डिसेंबर २०२४ मध्ये लैंगिक अत्याचार केला आणि यानंतर तिची निर्घुण हत्या केली होती. त्यानंतर पत्नी आणि रिक्षाचालक मित्राच्या साहाय्याने तिचा मृतदेह कब्रस्तानात फेकून दिल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा मुख्य आरोपी विशाल गवळी याला शेगाव पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेतले होते. यानंतर तो तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र आज, १३ एप्रिलच्या पहाटे त्याने शौचालयात टॉवेलच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.घटनेनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदन साठी जे .जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुंड होता. विशाल गवळीने तो राहात असलेल्या परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा गुन्ह्यांची नोंद होती. दरम्यान, विशाल गवळी याच्या आत्महत्येनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून निवृत्त न्यायाधीशांकडून याप्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.