महाराष्ट्रातील ठाणे शहरातील ‘गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्ती समिती’ विरोधात एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. इस्लामिक कमिटीने एक मोठे पोस्टर लावले ज्यामध्ये भारताच्या नकाशासोबत (Map) छेडछाड करण्यात आली होती आणि विकृत नकाशा लावण्यात आला होता. पोस्टरमध्ये भारताच्या नकाशातून(Map) पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि अक्साई चीन जाणूनबुजून काढून टाकण्यात आले. हे दोन्ही क्षेत्र भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि अशी कृती देशाच्या सार्वभौमत्वावर आणि एकतेवर थेट हल्ला आहे.
वृत्तानुसार, स्थानिक संघटना ‘स्वाभिमान संघटना’ने यासंबंधी ठाणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ठाणे पश्चिमेतील पडवळ नगर भागात असलेल्या रजितराम तिवारी भाजप जनसंपर्क कार्यालयाजवळ संघटनेच्या सचिवांना एक मोठा फ्लेक्स बोर्ड दिसला. या फलकावर मोईनुद्दीन चिश्ती यांचे वर्णन ‘भारताचा बादशाह’ असे करण्यात आले होते. तसेच, त्यावर मशिदीचे चित्र आणि भारतीय ध्वज देखील दाखवण्यात आला होता. ते म्हणाले की, हे पोस्टर केवळ भारताच्या एकता आणि अखंडतेच्या विरोधात नाही तर ते इस्लामिक राजवटीच्या संकल्पनेला चालना देण्याचा प्रयत्न करते.
(हेही वाचा PM Narendra Modi यांनी महायुतीच्या बैठकीत केला Raj Thackeray यांचा उल्लेख; तर आमदारांना दिला ‘हा’ सल्ला)
मिळालेल्या माहितीनुसार, हा फ्लेक्स बोर्ड ५ जानेवारी २०२५ रोजी कथित ‘सरकार गरीब नवाज आणि सरकार मुल्लान वाले बाबा’ यांच्या उर्सनिमित्त लावण्यात आला होता. समितीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या बॅनरचे फोटोही पोस्ट केले. मात्र, वाद वाढल्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. परंतु इतर संबंधित पोस्टवरून पुष्टी होते की वादग्रस्त बॅनर त्या भागात लावण्यात आले होते.
शहराच्या इतर भागातही असेच पोस्टर्स लावण्यात आले होते. पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही कृती जाणूनबुजून करण्यात आली असून त्यामुळे देशातील नागरिकांचा अपमान होत आहे. तक्रारदाराचे म्हणणे आहे की ही घटना राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला, एकतेला आणि अखंडतेला धोका आहे. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी ठाणे येथील श्रीनगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. पोलिस आता इस्लामिक समितीच्या सदस्यांविरुद्ध चौकशी करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि देशभक्त संघटनांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
Join Our WhatsApp Community