शेतकऱ्यांचा अतिशय आवडता सण म्हणजे बैलपोळा. आता अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी बैलांना नटवून, सजवून त्यांची गावात मिरवणूक काढण्याची प्रथा आहे.सध्या सर्वच शेतकऱ्यांची यासाठी लगबग सुरू असताना, महागाईचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी बैलांना करायच्या साजश्रृंगार साहित्याच्या किमतीत 15 ते 20 टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे.
शेतात शेतकऱ्यांसोबत बैलही काळ्या मातीत वर्षभर राबतात. त्यांनी शेतात केलेल्या श्रमांची उतराई म्हणून बैल पोळा साजरा केला जातो. याकरिता बैलांना सजवण्यासाठी आकर्षक वस्तूंची विक्री बाजारात होत असते. या सर्व साहित्याच्या कच्च्या मालाची दरवाढ आणि त्यावर लागलेल्या जीएसटीमुळे बैलांच्या सजावटीचे साहित्य 10 ते 20 टक्क्यांनी महागले आहे. राज्यात काही ठिकाणी नुकताच पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.यामुळे सर्जा राजासाठी शेतकरी वाटेल तेवढे रुपये खर्च करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.
(हेही वाचा -)
लाकडी नंदीबैलांची जोडीही झाली महाग
बैलपोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी लहान मुले लाकडी बैलाला सजवतात. तान्हा पोळ्यासाठी बाजारपेठेत लाकडी नंदी विक्रीसाठी उपलब्ध असतात, पण या लाकडी नंदी बैलांनाही महागाईचा फटका बसला आहे. लाकडी नदींची ही जोडी 1 हजारांपासून, 10 हजार रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community