Crime : डोंगरीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर पोलिसांची कारवाई; रियाजला अटक

136

बांगलादेशी नागरिकांच्या मदतीने डोंगरीत सुरू असलेल्या बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजवर एटीएसच्या पथकाने छापा टाकून ३२ वर्षीय इसमाला अटक करण्यात आली. या दरम्यान एटीएसने ४ सिमबॉक्स, १४९ एअरटेल कंपनीचे सिमकार्ड, पाच लाख एक्काहत्तर हजार शंभर रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

डोंगरी येथे एकजण घरामध्ये बेकायदेशीर सिम्बॉक्सच्या सहाय्याने अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने मंगळवारी सकाळी दक्षिण मुंबईतील डोंगरी येथील एका घरावर छापा टाकून रियास मोहम्मद पी. के. (३२) याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता घरातील पोटमाळ्यावर एक खाचा करून त्यात एकूण चार सिम बॉक्स सिमकार्ड भरलेल्या स्थितीत मिळून आले. या  सिमबॉक्सची पाहणी केली असता या चारही सिमबॉक्समध्ये एकूण १४९ एअरटेल कंपनीचे सिमकार्ड भरलेले मिळून आले, दरम्यान घटनास्थळावरून पाच लाख एक्काहत्तर हजार शंभर रूपयांची रोकड मिळून आली.

(हेही वाचा Sandeep Deshpande : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची मनसे नेते संदीप देशपांडेंनी उडवली खिल्ली)

रियास मूळचा केरळचा

एटीएसने या सर्व वस्तू आणि रोकड ताब्यात घेऊन रियासकडे चौकशी केली असता रियास हा मूळचा केरळ राज्यातील आहे. रियास हा  बांग्लादेश येथे राहणारा इसम अलामल याच्या मदतीने चायना सिमबॉक्स वापर करून घरात बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू केले होते. परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल रियास हा घरात बसविलेल्या उपकरणाद्वारे भारतातील इच्छुक मोबाईल नंबरवर अनधिकृतरित्या राऊट करून भारत सरकारच्या टेलिकॉम खात्याची आर्थिक फसवणूक करीत होता. एटीएसने या प्रकरणी रियास याच्याविरुद्ध डोंगरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४२०, ३४ सह भारतीय टेलिग्राफ कायदा कलम ४,२०,२५ आणि इंडियन वायरलेस टेलिग्राफी अॅक्ट १९३३ कलम ३, ६ अन्वये गुन्हा दाखल करून रियास याला अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.