देशभरात विविध ठिकाणी दररोज व्यक्ती, मोबाईल किंवा वाहन हरवल्याच्या घटना घडत असतात. त्यानंतर त्यांची शोधाशोध करण्यासाठी पोलिसात तक्रार द्यावी लागते. पण हेच काम आता सोपे करण्यासाठी नागपूरच्या कलमना पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन कोएलवार यांनी एक अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून हरवलेल्या वस्तू आणि व्यक्तींची तक्रार करणे सोपे होणार आहे.
(हेही वाचाः रेपो रेट वाढला की सर्वसामांन्यांची कर्ज का महागतात? वाचा सोप्या शब्दांत)
देशातले पहिले अॅप
पोलिस क्लब इंडिया हे अॅप सध्या अँड्रॉइडवर मोफत उपलब्ध आहे. हे अॅप भारतातील सर्व 28 राज्ये, 7 केंद्रशासित प्रदेशमधील सर्व पोलिस स्टेशनना डिजीटली कनेक्ट करणारे देशातील पहिले अॅप आहे. या अॅपमध्ये चार वेगवेगळे फिचर आहेत. त्यामध्ये फोनबूक या ऑप्शनमध्ये देशातील सर्व पोलिस स्टेशनचे नंबर देण्यात आले आहेत. त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागांतील पोलिस स्टेशनशी संपर्क करणे अतिशय सोपे होणार आहे.
कसे काम करते अॅप?
यातील मिसिंग अँड फाउंड या फिचरद्वारे पोलिस आपल्याकडे नोंदवलेल्या व्यक्ती, वाहने, मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू, कागदपत्रे, बॅग, दागिने इतकंच नाही तर पाळीव प्राणी हरवल्याच्या तक्रारी डिजिटली अपडेट करू शकतात. जेणेकरुन देशभरातील सर्व पोलिस स्टेशनला या तक्रारींबाबत माहिती मिळेल. तसेच तक्रारदार सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये आपली तक्रार नोंदवण्याच्या आधी या अॅपच्या माध्यमातून पोलिस स्टेशनला टॅग करुन आपली तक्रार नोंदवू शकतो.
असे केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन त्या पोलिस स्टेशनमधील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना जाईल. ज्यामुळे पोलिसांना सुद्धा आपल्या विभागातील अपहरण किंवा चोरीच्या घटनांची त्वरित माहिती मिळेल. जेणेकरुन पोलिस स्टेशनात येऊन तक्रार नोंदवण्यापर्यंतचा वेळ वाचवता येईल, असे देखील कोएलवार यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः ‘ही’ आहे इंग्रजांच्या काळातली भारताची पहिली ‘आत्मनिर्भर’ बँक)
Join Our WhatsApp Communityपोलिस खात्यात भरती झाल्यानंतर पोलिस खात्याला अद्ययावत करण्याचा विचार माझ्या डोक्यात आला. माझ्या या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी अनेकांनी मला मदत केली. शासनानेही या अॅपच्या विस्तारासाठी सहाय्य करावे अशी अपेक्षा आहे.
-नितीन कोएलवार, सहायक पोलिस निरीक्षक(कलमना पोलिस स्टेशन)