Cattle Smugglers : दंगल घडवण्यासाठी हिंदूबहुल भागात गोवंशाचे अवशेष फेकणाऱ्या तारिक, आरिफला अटक

60
Cattle Smugglers : दंगल घडवण्यासाठी हिंदूबहुल भागात गोवंशाचे अवशेष फेकणाऱ्या तारिक, आरिफला अटक
Cattle Smugglers : दंगल घडवण्यासाठी हिंदूबहुल भागात गोवंशाचे अवशेष फेकणाऱ्या तारिक, आरिफला अटक

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) गोतस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. हे गोतस्कर (Cattle Smugglers)गाईंना मारून हिंदू भागात फेकत. गोतस्कर (Cattle Smugglers)हे या कामाच्या माध्यमातून लोकांना भडकावण्याचा आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी गोतस्करांच्या टोळीतील ३ लोकांना अटक केली आहे. गोतस्करांनी जम्मू काश्मीरमधील नगरोटामध्ये दंगल भडकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरच त्यांना अटक करण्यात आली.

( हेही वाचा : डिजिटल भारत योजनेंतर्गत गावकऱ्याला मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’; महसूलमंत्री Chandrasekhar Bawankule)  

पोलिसांनी अटक केलेल्या तीन गोतस्करांमध्ये मुख्यियार अहमद ( Mukhtyar Ahmad) , तारीक हुसैन (Tariq Hussain) आणि आरीफ यांचा समावेश आहे. हे तीनही आरोपी अनेक गोतस्कर अनेक दिवसांपासून गोतस्करीचे काम करत होते. गोवंशाला मारून त्यानंतर क्रुरतेने ट्रकात गोवंशांचे मांस टाकत असत. तसेच हे मेलेल्या गाईंचे तुकडे हिंदूबहुल परिसरात टाकले जात. (Cattle Smugglers) दि. २४ डिसेंबर रोजीही या तिघांनी हाच कट रचण्याचा प्रयत्न केला होता. नगरोटा येथील जगती-राजपूर रस्त्यावर त्यांनी गाईंचे मांस फेकले. मात्र त्यावेळी सकाळी याच मार्गावरून काही स्थानिक लोक रस्त्याने प्रवास करत होते. यावेळी त्याला दुर्गंधी येऊ लागली. आजूबाजूच्या लोकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना एक गाय व वासरू मृतावस्थेत पडलेले दिसले.

काही वेळातच ही बातमी आजूबाजूच्या परिसरात पसरली. स्थानिक लोकांसह हिंदू (Hindu) संघटनांशी संबंधित सदस्यही घटनास्थळी पोहोचू लागले. या सर्व प्रकारावर नाराजी व्यक्त होत होती. पोलिसांना ही माहिती मिळताच स्थानिक एसएचओ परवेज सज्जाद पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले.लोकांचा रोष पाहून त्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी २४ तासांचा अवधी मागितला. लोकांना समजावून परत पाठवले. आरोपींची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले. एका फुटेजमध्ये नोंदणी क्रमांक २१९५ असलेला ट्रक ओळखला गेला. याचाच आधार घेत पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला.

ट्रकच्या नंबरद्वारे पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे या तिघांना पकडण्यात आले. यातील मुखतियार हा काश्मीरमधील अनंतनागचा रहिवासी आहे, तर आरिफ आणि तारिकचे घर जम्मूच्या रियासी भागात आहे. या सर्वांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या चौकशीत तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचा ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वीही या तिघांनी मिळून एक मेलेली गाय जगती परिसरात फेकून दिली होती. त्यानंतर संतप्त हिंदूंनी या घटनेचा निषेध केला. गाई फेकून हिंदू-मुस्लिम दंगल भडकवायची होती, असेही ते म्हणाले. (Cattle Smugglers)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.