- प्रतिनिधी
महाराष्ट्र्र पोलीस दलातील निशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीसाठीच्या नावांची यादी गृह विभागाकडून तयार करण्यात आली आहे. राज्यभरातील ४६६ पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीची यादी तयार करण्यात आली. त्यात मागील वर्षी पदोन्नती न मिळालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आहेत. या यादीत मागील वर्षी पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस निरीक्षकांची नावे असून यंदा त्यांना पदोन्नती घ्यावीच लागणार असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. या अधिकाऱ्यांची माहिती गृह विभागाला पाठवून लवकरच त्यांना पदोन्नती देण्यात येईल अशी माहिती एका अधिकाऱ्याने सांगितली आहे. (Police)
महाराष्ट्र्र पोलीस दलातील निःशस्त्र पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदोन्नतीसाठी यादी गृह विभागाकडून काढली जाते. या यादीत नमूद अधिकाऱ्यांची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागविण्यात येते. या माहितीनुसार त्यांना एसीपी म्हणून पदोन्नतीसाठी पात्र ठरविण्यात येते. २०२४-२५ या वर्षी एसीपी पदोन्नतीसाठी राज्याच्या गृह विभागाने ४६६ पोलीस निरीक्षकाही यादी नुकतीच जाहीर केलेली असून त्यांची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून तात्काळ गृह विभागाकडे पाठवण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. यादीत असलेल्या ४६६ पोलीस निरीक्षक हे संपूर्ण राज्यातील आहे. (Police)
(हेही वाचा – Smart Electricity Meter बाबत पुनर्विचार करण्याची भाजपाची बेस्टकडे मागणी)
एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ज्या पोलीस निरक्षकाला सेवानिवृत्तीसाठी बराच कालावधी बाकी असतो तो अधिकारी पदोन्नतीसाठी इच्छुक नसतो. पदोन्नती टाळण्यासाठी तो अधिकारी आपल्या सर्व्हिसच्या काळात त्याच्यावर असलेले विभागीय चौकशी, कसुरी अहवाल तसेच एखाद्या प्रकरणात त्याला आलेल्या नोटीसचा आसरा घेऊन पोलीस महासंचालक कार्यालयाला माहिती पाठवून एकप्रकारे एसीपीचे प्रमोशन नाकारतो, त्यामागचे कारण म्हणजे मुंबई तसेच महानगरामध्ये एसीपी हे पद एक्झिक्युटिव्ह पद आहे. (Police)
निशस्त्र पोलीस निरीक्षक यांना मुंबई तसेच इतर महानगरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळते यासाठी अनेक जण सेवानिवृत्तीचा काळ जवळ येत नाही तो पर्यंत एसीपी प्रमोशन घेत नाही. सेवानिवृत्तीच्या अगदी शेवटच्या क्षणाला हे अधिकारी एसीपीचे प्रमोशन घेत असतात अशी माहिती या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने दिली आहे. जे पोलीस निरीक्षक एसीपीचे प्रमोशन नाकारतात त्यांच्यामुळे इतरांना पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदावर काम करण्याची संधी मिळत नाही असेही या अधिकाऱ्याने सांगितले. जे अधिकारी एसीपी प्रमोशन नाकारतात अशा पोलीस निरीक्षकांची पोलीस ठाण्यातून बदली करून त्यांना साईड पोस्टिंग देण्यात यावी अशी मागणी या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने केली आहे. (Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community