Nandurbar : नमाज पठणात व्यत्यय नको म्हणून टीव्हीचा आवाज कमी ठेवा; तुघलकी आदेश काढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

नमाज पठनाच्या वेळी सईरीच्या वेळी व इतर वेळी आपल्या घरातील टि.व्ही चा व ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवावा. आपल्या घरातील टि.व्ही चा व ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे हिंदू व मुस्लीम धर्मातील लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे या आदेशात म्हटले होते.

461
नंदुरबार (Nandurbar) येथे शहर पोलिसांनी एक तुघलकी आदेश काढला. रमजानमध्ये मुसलमानांना नमाज पठण करताना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून हिंदूंना त्यांच्या घरातील टीव्हीचा आवाज कमी करण्याचा तुघलकी आदेश नंदुरबार शहर पोलिसांनी काढला, ज्यामुळे समाजात प्रचंड संताप निर्माण झाला. त्याचा परिणाम म्हणून हा आदेश काढणारे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांची तडकाफडकी गच्छंती करण्यात आली.

काय म्हटले होते तुघलकी आदेशात? 

नंदुरबार (Nandurbar) शहर पोलीस ठाण्याने २१ मार्च २०२४ आदेश काढला होता. रमजानच्या पार्श्वभूमीवर हा विशेष आदेश काढण्यात आला. या आदेशात रॅली/मोर्चे/मिरवणूका सभा, रास्तारोको आंदोलन, उपोषण, जाहीर घोषणा करणे, इतर समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारच्या घोषणा, गाणी म्हणणे वाद्य वाजविणे यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच जमावबंदी करण्यात आली आहे. मुस्लीम धर्मियाचा पवित्र रमजान सण सुरु असून आपण नमाज पठनाच्या वेळी व सईरीच्या वेळी आपण आपल्या घरामध्ये टि.व्ही व ध्वनिक्षेपकाचा मोठा आवाज केल्याने नमाज पठनाच्या वेळी व सईरीच्या वेळी अडथळा निर्माण होत असल्याबाबत तोंडी तक्रार प्राप्त झाली आहे. तरी आपण नमाज पठनाच्या वेळी, सईरीच्या वेळी व इतर वेळी आपल्या घरातील टि.व्ही चा व ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवावा. आपल्या घरातील टि.व्ही चा व ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे हिंदू व मुस्लीम धर्मातील लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. या काळात वरील दिलेल्या सुचनांचे उल्लंघन केल्यास आपल्या विरुध्द प्रचलित कायद्यानुसार योग्य तो कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच या नोटीसीचा वापर आपल्याविरुध्द न्यायालयात पुरावा म्हणून वापर करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे या आदेशात पोलिसाने म्हटले आहे.
नंदुरबार (Nandurbar) पोलिसांचा मुसलमानांच्या रमजानसाठी हिंदूंच्या विरोधात तुघलकी आदेश काढला आहे. हा आदेश सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, त्यामुळे तात्काळ हा तुघलकी आदेश काढणारे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांची तडकाफडकी गच्छंती करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.