भारत देश गुरुवारी ७८ वा स्वातंत्र्य दिवस (78 th independence day) साजरा करत आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला. भारताला मिळालेलं हे स्वातंत्र्य सोपं नव्हतं. या स्वातंत्र्यांसाठी हजारो नागरिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. त्यामुळे खूप संघर्षानंतर हे स्वातंत्र्य भारतीयांच्या नशिबात आलं आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी जास्त महत्त्वाचा आहे. (Police President Medal)
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाची राजधानी दिल्लीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या हस्ते अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यामध्ये शाळकरी मुलं, तरुण आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. यावर्षीदेखील राज्यातील ३ वरिष्ठ पोलीस अधिकारी, अग्निशमन दलातील (fire brigade) एक अधिकारी, कारावास सेवेतील एक हवालदार यांना पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. तर १७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पोलीस सेवेतील अतुलनीय शौर्यतेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. (Police President Medal)
महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक
- चिरंजीव रामचबिला प्रसाद, अतिरिक्त पोलिस महासंचालक
- राजेंद्र बालाजीराव दहाळे, संचालक
- सतीश रघुवीर गोवेकर, सहायक आयुक्त
(हेही वाचा – Arvind Kejriwal: सुप्रीम कोर्टाने केजरीवालांचा अंतरिम जामीन अर्ज पुन्हा फेटाळला)
महाराष्ट्र पोलीस सेवेतील शौर्यतेसाठी राष्ट्रपती पदक
- कुणाल शंकर सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी
- दीपक आवटे, पोलीस उपनिरीक्षक
- कै. धनाजी होनमाने, पोलीस उपनिरीक्षक (मरणोपरांत)
- नागेश कुमार एम. (नायक पोलीस शिपाई)
- शकील युसूफ शेख ( पोलीस शिपाई)
- विश्वनाथ पेंदाम ( पोलीस शिफाई)
- विवेक नारोटे ( पोलीस शिपाई)
- मोरेश्वर पोटवी ( पोलीस शिपाई)
- कैलास कुलमथे (पोलीस शिपाई)
- कोठला कोर्मी ( पोलीस शिपाई)
- कोर्के वेलडी ( पोलीस शिपाई)
- महादेव वानखडे ( पोलीस शिपाई)
- आयपीएस अनुज तारे (अतिरिक्त पोलिस अधिक्षक)
- राहुल देव्हडे (पोलीस उपनिरीक्षक)
- विजय सकपाळ ( पोलीस उपनिरीक्षक)
- महेश मिच्छा ( हेड कॉन्स्टेबल)
- समया असम ( नायक पोलीस शिपाई)
(हेही वाचा – P R Sreejesh : श्रीजेशला प्रशिक्षक म्हणून ज्युनिअर खेळाडूंवर काम करण्याची इच्छा)
अग्निशमन दल
संतोष वारीक, मुख्य अग्निशमन अधिकारी (Chief Fire Officer), महाराष्ट्र
कारावास सेवा
अशोक ओलंबा, हवालदार (Police President Medal)
हेही वाचा –