Police Recruitment : १७ हजार पदांसाठी १७ लाख ७६ हजार अर्ज, १९ जून पासून मैदानी चाचणी सुरू

307
Police Recruitment : मैदानासाठी मुंबई पोलिसांची वणवण

महाराष्ट्र पोलीस दलात १७ हजार ४७१ विविध पदांसाठी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी राज्यभरातून १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आले आहे, १९ जून पासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विविध जिल्ह्यामध्ये मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण आणि खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी सोमवारी (१७ जून) पत्रकार परिषदेत दिली. (Police Recruitment)

लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्र पोलीस दल आणि कारागृह शिपाई भरती २०२२-२३ प्रक्रिया १९ जून पासून सुरू करण्यात आली आहे. १७ हजार ४७१ विविध पदांसाठी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी राज्यभरातून १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आले असल्याची माहिती अप्पर पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण आणि खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्य कारागृह रक्षक पदांसाठी होणाऱ्या भरतीचा भार यंदा महाराष्ट्र पोलिसांवर टाकण्यात आला आहे. (Police Recruitment)

महाराष्ट्र पोलीस दलाच्या भरतीसाठी राज्यभरातून १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आले आहेत, त्यातून १७ हजार ४७१ उमेदवार निवडले जाणार आहेत. १९ जून पासून विविध जिल्ह्यात भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून मैदानी परीक्षा आणि लेखी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. जर पावसामुळे एखाद दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अश्या उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. (Police Recruitment)

(हेही वाचा – T20 World Cup, Pakistan Exit : पाकिस्तानच्या पराभवाचं खापर पुन्हा एकदा बाबर आझमवर फुटणार?)

मागच्या वेळी झालेल्या पोलीस भर्तीदरम्यान भरतीसाठी आलेल्या अनेक उमेदरवारा कडून मैदानी आणि लेखी परीक्षा दरम्यान मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वापरण्यात आले होते, याप्रकरणी राज्यभर जवळपास १०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते. यंदाच्या भरतीमध्ये पुन्हा हा प्रकार होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येईल तसेच विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. (Police Recruitment)

कुठल्या पदासाठी किती अर्ज?
  • पोलिस काॅन्स्टेबल पद जागा – ९५९५
    अर्ज – ८ लाख २२ हजार ९८४
  • पोलिस काॅन्सटेबल ड्रायव्हर पद जागा – १ हजार ६८६
    अर्ज – १ लाख ९८ हजार ३००
  • बॅन्ड्समॅन पद जागा – ४१
    अर्ज – ३२ हजार २६
  • एसआरपीएफ पद जागा – ४ हजार ३४९
    अर्ज – ३ लाख ५० हजार ५९२
  • तुरुंग हवालदार पद जाग – १ हजार ८००
    अर्ज – ३ लाख ७२ हजार ३५४ (Police Recruitment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.