पोलीस भरतीचा घोळ सुरुच; फाॅर्म भरण्यापासून ते सर्व्हर डाऊनमुळे उमेदवार अडचणीत

166

काही दिवसांपूर्वी पोलीस भरतीची जाहिरात आल्यानंतर राज्यातील युवक युवतींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. पोलीस भरती होण्यासाठी उमेदवारांकडून तयारी केली जात आहे. मात्र आता राज्यात 18 हजार पोलीस भरतीच्या जागा निघाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी घाई केली आहे. मात्र, तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे एका उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी किमान चार ते पाच दिवस लागत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पोलीस भरतीचा फाॅर्म भरताना परीक्षार्थींना प्रचंड त्रासाला समोरे जावे लागत आहे.

फाॅर्म भरण्याची मुदत वाढवावी

पोलीस भरतीचे फाॅर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी गडबड चालू केलेली असतानाच, ज्या वेबसाईटवरुन फाॅर्म भरला जात आहे. त्या वेबसाईटवर सर्व्हर डाऊन असल्यामुळे फाॅर्म भरताना अनेक अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे फाॅर्म सबमिट करताना, किमान चार ते पाच दिवस लागत आहेत. सांगली जिल्ह्यातील उमेदवार जिल्ह्याच्या ठिकाणी फाॅर्म भरण्यासाठी पहाटे चार वाजता सांगलीत येत आहेत. त्यामुळे दिवसभर थांबूनही फाॅर्म सबमिट होत नसल्याने 30 तारखेपर्यंत फाॅर्म भरले गेले नाहीत तर भरतीसाठी जाणा-या उमेदवारांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे 30 तारीख ही अंतिम मुदत न ठेवता ती वाढवण्यात यावी अशी मागणी आता या परीक्षार्थींनी केली आहे.

( हेही वाचा: आजपासून सरकारी रुग्णालयात परिचारिकांचा संप ? जाणून घ्या सरकारी रुग्णालयातील परिस्थिती )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.