लॉकडाऊननंतर अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, काही लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. जे विद्यार्थी, पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या तरूणांसाठी महत्वाची बातमी आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
( हेही वाचा : राज ठाकरेंचा ‘वसंता’ करणार पुण्याच्या सभेची जंगी तयारी!)
हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
राज्यात या सात हजार पदांच्या भरतीनंतर लवकरच दहा हजार पदांसाठीही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता आता भरती प्रक्रिया गृहखात्याकडून राबवण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलीस भरती झाली नव्हती. त्यामुळे या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कित्येक महिन्यांपासून या विद्यार्थ्यांचे डोळे पोलीस भरतीकडे लागले होते. पण आता अखेर महाविकास आघाडीने ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० आणि दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २०० पोलीस भरती करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येईल असे सांगितले होते.
Join Our WhatsApp Community