पुण्यात पोलिस उपनिरीक्षकाच्या आईचा भर दिवसा खून!

पुण्यातील वारजे या भागात ही घटना घडली. मृत महिला ही सातारा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांची आई आहे. या प्रकारामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव शबाई शेलार (६५) आहे.

दोनच दिवसांपूर्वी पुण्यात भर दिवसा एका पोलिस हवालदाराचा चाकूने हल्ला करून खून केल्याची घटना घडली असतानाच शनिवारी, ८ मे रोजी पोलिस उपनिरीक्षकाच्या आईचा दिवसाढवळ्या भर दिवसा भोसकून खून करण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे पुण्यात कोरोना वाढला असताना दुसरीकडे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.

मृत महिलेचा भंगाराचा व्यवसाय!

पुण्यातील वारजे या भागात ही घटना घडली. मृत महिला ही सातारा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांची आई आहे. या प्रकारामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव शबाई शेलार (६५) आहे. वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी या घटनेची नोंद केली. येथील रामनगर भागातील भाजी मंडईत एक मैदान आहे. तिथे शबाई यांचे भंगाराच्या दुकान होते. एक व्यक्ती भंगार विकण्याच्या निमित्ताने सकाळी दुकानात आला ततेव्हा त्याला शबाई शेलार रक्ताच्या थोराळ्यात पडलेल्या आढळून आल्या.

(हेही वाचा : उत्तर महाराष्ट्र, विदर्भात कोरोनानंतर आता म्युकोरमायकोसिसचे संकट)

ओळखीच्या व्यक्तीने खून केल्याचा संशय 

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शाबाई यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचाराआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हत्येमागे नक्की काय कारण आहे, हे अद्याप समजू शकले नाही, असे पोलिस निरीक्षक खटके म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here