राज्य पोलीस दलातील बदल्यांचे सत्र सुरूच आहे. पोलीस दलातील (Police Transfers) ८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी गृह विभागाने दिले आहेत.
या आदेशानुसार, पोलीस अधीक्षक, उपायुक्त, अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस दलातील निसर्ग ओतारी, अरुण घोडके या २ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदली आदेशाची प्रत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेश गृह विभागाने दिले आहेत.
(हेही वाचा – Modi Govt च्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची विक्रमी घोडदौड; विश्वास पाठक यांचे प्रतिपादन)
न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या आदेशाचा भंग होणार नाही, याची पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे. बदली आदेशानंतर जे पोलीस गैरहजर राहतील, त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा, असे आदेशात म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community