गणेशोत्सव काळात पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द होणार नाहीत

101

गणेशोत्सवाच्या काळात इतरांप्रमाणे पोलिसांनाही सणाचा आनंद लुटता यावा, याकरता त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करु नयेत, अशी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केली. जिल्ह्यातील पोलीस अधिका-यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, गणेशोत्सव काळात प्रभारी अधिका-यांनी आपल्या हद्दीतील मंडळांच्या बैठका घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याविषयी मार्गदर्शन व प्रबोधन करावे. विशेषत: ध्वनिप्रदूषणाबाबतचे प्रबोधन करावे. प्रत्येक मंडळाजवळ एक पोलीस कर्मचारी नियुक्त करावा. सणाच्या काळात पोलीस कर्मचा-यांना सणाचा आनंद लुटता यावा. याकरता त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करु नयेत.

( हेही वाचा: देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमू्र्ती लळीत यांनी घेतली शपथ )

28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरदरम्यान अर्जित सुट्ट्या देऊ नयेत. यात वैद्यकीय कारणास्तव अधिकारी व कर्मचा-यांना काही अडचण असेल त्यांना त्या दिवशी रजा घेता येईल. पोलिसांच्या मदतीला 1700 हून अधिक गृहरक्षक दलाचे जवान उत्सव काळात कार्यरत राहतील. यासह अन्य बाबींचाही आढावा जिल्ह्यातील पोलीस अधिका-यांकडून घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.