- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या मलजल प्रक्रिया केंद्रांचा आढावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीएससी) घेण्यात आला असून मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महापालिकेच्या मालाड, वर्सोवा, बांद्रा आणि धारावी येथील मलजलशुद्धीकरण प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. यावेळी अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून कशाप्रकारे ते शुद्ध केले जाते आणि त्यामुळे जवळ जवळ लाखो लिटर पाण्याची कशी बचत होईल याचे प्रात्यक्षिक संबंधित अधिकाऱ्यांनी कदम यांना दिले. (Pollution Board)
मालाड येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मलजलशुद्धीकरण अर्थात सांडपाणी यंत्रणेच्या प्रकल्पाचा आढावा एमपीएससीचे अध्यक्षच सिद्धेश कदम यांनी घेतला. या प्रकल्पाचे काम सन २०२८ मध्ये पूर्ण होणार असून ४०० दशलक्ष पेक्षा जास्त सांडपाणी या प्रकल्पात शुद्ध केले जाणार आहे. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य अभियंता व इतर अधिकारी वर्गाकडून या संपूर्ण प्रकल्पाच्या कामाबाबत त्यांनी सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. (Pollution Board)
(हेही वाचा – Union Budget 2025 : सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प – प्रविण दरेकर)
त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वर्सोवा येथे उभारण्यात येणाऱ्या मलजलशुद्धीकरण प्रकल्पालाही त्यांनी भेट देऊन या प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प १८० दशलक्ष लिटर असून पुढील दोन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अभियंत्यांनी दिली. यासह धारावी येथील नव्याने उभ्या राहत असलेल्या मलजल शुद्धीकरण प्रकल्पालाही भेट देऊन या प्रकल्पाचा आढावा त्यांनी घेतला या कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना त्यांनी केल्या. (Pollution Board)
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उभारलेल्या सतत वातावरणीय हवा गुणवत्ता केंद्रांची पाहणी करण्याच्या अनुषंगाने सिद्धेश कदम यांनी मालाड येथील फायर ब्रिगेड स्टेशन जवळील केंद्राला व कूपर हॉस्पिटल येथील केंद्राला भेट दिली. यावेळी गेल्या दोन महिन्यांचा तांत्रिक आढावा देखील त्यांनी घेतला. (Pollution Board)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community