Pollution : बेकरींमुळे वाढतेय प्रदूषण, अभ्यास अहवालात हे सत्य आले समोर!

114
Pollution : बेकरींमुळे वाढतेय प्रदूषण, अभ्यास अहवालात हे सत्य आले समोर!

मुंबईत आजही बेकरी या लाकडावर आधारित असून या लाकडाच्या धुरामुळे मोठ्याप्रमाणात वायूचे प्रदूषण (Pollution) होत असून हवेची गुणवत्ता सुधरवण्यासाठी या बेकऱ्यांमध्ये लाकडाऐवजी विद्युत अथवा पीएनजीवर आधारीत भट्टीचा वापर केला जावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बाँबे इन्व्हॉयमेंटल ऍक्शन ग्रुप अर्थात बीइएजी यांनी मागील सहा महिन्यांमध्ये मुंबईतील बेकरींचा अभ्यास केला असून या मध्ये बऱ्याच बेकऱ्यांमध्ये लाकडाचा वापर केला जात असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे आणि पर्यायाने मुंबईकरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याचे या अभ्यास अहवालात नमुद केले आहे. याबाबतचा अहवाल बीइएलजी या संस्थेने महाराष्ट्र प्रदुषण मंडळ आणि मुंबई महापालिका प्रशासनाला सादर करून याबाबत बेकऱ्यांमध्ये पर्यावरणपुरक भट्टी बसवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली आहे.

बेकरी पदार्थांच्या उत्पादनांमुळे मुंबईतील हवा प्रदूषित (Pollution) होत असल्याची बाब समोर आल्याने बाँबे इन्व्हॉयमेंटल ऍक्शन ग्रुप अर्थात (बीइएजी) यांनी मुंबईतील बेकऱ्यांचा सर्वे केला. मुंबईत महापालिकेच्या आरोग्य विभागांत नोंदणीकृत अशा ६२५ बेकरी असून यातील सुमारे २०० बेकरींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मुंबईतील १७ वॉर्डांमधील बेकरींना प्रत्यक्ष भेट देऊन अणि सर्वेक्षण करून इंधनाचा वापर, बेकरींची कार्यपध्दती आणि स्वच्छ इंधनामध्ये परिवर्तन होण्याची व्यवहार्यता या आधारीत सर्वे करून बेकरींचा अभ्यास करून हा अहवाल बनवण्यात आला आहे.

(हेही वाचा – Badlapur School Case: बदलापूरच्या घटनेनंतर ‘त्या’ शाळेसंबंधी सरकार ने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय )

हा आहे बेकरींच्या इंधनाचा प्राथमिक स्त्रोत

या सर्वे अभ्यासात आजही बहुतांशी बेकरीच्या भट्टीमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर करताना आढळले. ज्यामुळे हानीकारक अशा प्रदूषकांचे उत्सर्जन होते. यामध्ये पार्टिक्युलेट मॅटरश्, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि व्होलटाईल ऑर्गेनिक कंपाऊंड्स यासारख्या प्रदुषकांचा यामध्ये समावेश आहे. या उत्सर्जनामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे बीइएजीच्या माजी कॅम्पेन संचालक हेमा रमाणी आणि प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुहीन बॅनर्जी यांनी प्रेस क्लबमधील आयोजित पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केले.

या सर्वेक्षणात २०० बेकरींपैंकी ४७.१० टक्के बेकरी या इंधन म्हणून प्रामुख्याने लाकडाचा वापर करतात. लॉगवूडच्या तुलनेत खूपच कमी खर्च असल्यामुळे जुन्या फर्निचरमधून मिळणारे लाकूड, जीर्ण, मोडकळीस आलेल्या इमारतींमधील लाकूड असे भंगार लाकूड हा या बेकरींच्या इंधनाचा प्राथमिक स्त्रोत आहे. यामुळे शहरातील हवा प्रदूषणाच्या (Pollution) पातळीत मोठी भर पडते. लाकडाचा वापर करणाऱ्या बेकरी दिवसाला सर्वसाधारणपणे सरासरी सुमारे १३० किलो लाकूड वापरतात. लाकडाचा वापर करणाऱ्या बेकरी या दिवसाला सुमारे २५० ते ३०० किलो दरम्यान लाकडाचा इंधन म्हणून वापर करतात असे त्यांनी या अहवाला नमुद केले आहे.

(हेही वाचा – Badlapur Sexual Assault Case : एसआयटीकडून तपास सुरू, कुटुंबियांचे नोंदवले जबाब)

पुढील दोन वर्षांत सर्व बेकरींमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर होईल

साधारणपणे २० किलो पीठापासून पाव करण्यासाठी चार ते पाच किलो लाकूड गरजेचे असते आणि भंगार लाकडाची किंमत साधारण एका किलोला चार ते पाच रुपये अशी आहे. या लॉगवूड १० ते १२ रुपये किलो रुपये आहे. लाकूड जाळणाऱ्या बेकरीमध्ये तयार होणाऱ्या राखेची विल्हेवाट ही बहुतांशी डम्पिंग ग्राऊंडवर केली जाते. परिणामी हवा प्रदूषणात (Pollution) भर पडते असे हेमा रमाणी यांनी स्पष्ट केले. या बेकऱ्यांमध्ये लाकडापाठोपाठ वीज हे दुसऱ्या क्रमांकांचे वापरले जणारे सर्वसाधारण इंधन असून २८.१० टक्के बेकरींमध्ये त्याचा वापर होतो, तर एलपीजी आणि वीज असा संयुक्त वापर हा २०.९० टक्के बेकरींमध्ये केला जातो.

या अभ्यास अहवालात बीईएजी यांनी बेकरी मालकांवरील सुरुवातीच्या काळातील गुंतवणुकीचा बोजा कमी करण्यासाठी आर्थिक सहायता, कर सूट किंवा आर्थिक प्रोत्साहन देण्याची सूचना केली आहे. स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे होणारे आरोग्याचे फायदे आणि हवा प्रदूषणावरील (Pollution) परिणाम याबाबत जनजागृती होण्यासाठी वॉर्डनिहाय कार्यशाळांचे आयोजन करावे. पीएनजीमध्ये परिवर्तन सुनिश्चित होण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड आणि बेकरी ओव्हन उत्पादकांना सामील करून घ्यावे आणि पर्यावरणीय नियमांचे पालन करण्यासाठी राखेची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतीचा अनुकूल पर्याय द्यावा अशी सूचनाही या अभ्यास अहवालात केल्या आहेत. बेकरींशी निगडीत सर्व घटकांचा सकारात्मक सहभाग आणि आर्थिक प्रोत्साहन यांच्या सहाय्याने पुढील दोन वर्षांत सर्व बेकरींमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर होईल याची शक्यता हेमा रामाणी यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.