नवी मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच नवी मुंबई हे शहर प्रदूषणमुक्त होणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने नवी मुंबई महापालिका हद्दीत उभारण्यात आलेल्या हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणाऱ्या केंद्रांचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या आठवडाभरात हे केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. या गुणवत्ता मोजमाप केंद्रामुळे हवेच्या प्रदूषणाची पातळी तपासणे सहज शक्य होणार आहे.
( हेही वाचा : ‘या’ अनोख्या उपक्रमातून कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जात आहेत )
प्रदूषणाची पातळी मोजणे शक्य
बेलापूर अग्निशमन केंद्र, पावणे गाव आणि सानपाडा सेन्सरी उद्यान या तीन ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात आली असून यातून शहराच्या प्रदूषणाची पातळी मोजणे सहज शक्य होणार आहे. यामुळे शहरातील प्रदूषण, त्यावर कसे नियंत्रण मिळवू शकतो यावर अभ्यास करणे सोयीचे होणार आहे. तीन महिन्यांपूर्वी या केंद्रांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. या केंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
१३ प्रदूषकांचे मोजमाप
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आतापर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, महापे येथे एक आणि पालिका सांडपाणी सयंत्रणा प्रकल्प, सीवूड, नेरुळ या ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. त्यातून हवेची गुणवत्ता, प्रदूषण यांची माहिती प्रदूषण मंडळाला मिळते. या यंत्रणेद्वारे १३ प्रदूषकांचे मोजमाप केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community