Pooja Khedkar ला उमेदवारी रद्द करण्याचा आदेश मिळालाच नाही ?; यूपीएससी दिल्ली न्यायालयात म्हणाले…

193
Pooja Khedkar ला उमेदवारी रद्द करण्याचा आदेश मिळालाच नाही ?; यूपीएससी दिल्ली न्यायालयात म्हणाले...
Pooja Khedkar ला उमेदवारी रद्द करण्याचा आदेश मिळालाच नाही ?; यूपीएससी दिल्ली न्यायालयात म्हणाले...

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची उमेदवारी रद्द करण्याच्या त्यांच्या आदेशाची प्रत त्यांना दोन दिवसांत देण्यात येईल, असे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले.

(हेही वाचा – Pune Ammonia Gas Leak: पुण्यातील कारखान्यातून अमोनिया वायूची गळती सुरू, १७ कर्मचारी रुग्णालयात)

यूपीएससीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाला आव्हान देणारी याचिका निकाली काढली. न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केलेला नाही किंवा खटल्याच्या गुणवत्तेवर कोणतेही मत व्यक्त केले नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले.

कॅटकडे जाणार ?

आदेशाला आव्हान देण्यासारख्या इतर सवलतींसाठी खेडकरांना प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) जावे लागेल, असे आदेशात म्हटले. सुनावणीदरम्यान खेडकर (Pooja Khedkar) यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सांगितले की, त्यांच्या अशिलाला उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल कधीही माहिती देण्यात आली नाही. केवळ एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती मिळाली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.