‘आरबीआय’च्या उपगव्हर्नरपदी Poonam Gupta यांची नियुक्ती

68
'आरबीआय'च्या उपगव्हर्नरपदी Poonam Gupta यांची नियुक्ती
'आरबीआय'च्या उपगव्हर्नरपदी Poonam Gupta यांची नियुक्ती

केंद्र सरकारने नॅशनल काउंसिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) च्या महासंचालक पुनम गुप्ता (Poonam Gupta) यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती केली आहे. तीन वर्षाच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. RBI चे माजी उपगव्हर्नर एम. डी. पात्रा यांनी जानेवारीमध्ये राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यानंतर अखेर दि. २ एप्रिल रोजी पुनम गुप्ता (Poonam Gupta) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

( हेही वाचा : ‘…औरंगजेब इथे गाडला गेला’; राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेकडून Chhatrapati Sambhaji Nagar मध्ये बॅनरबाजी

सध्या पुनम गुप्ता (Poonam Gupta) या भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक धोरण संशोधन संस्था NCAER च्या महासंचालक आहेत. त्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य आहेत तसेच 16 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार समितीच्या संयोजक म्हणूनही कार्यरत आहेत. मात्र मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) पुनम गुप्ता यांच्या RBI उपगव्हर्नर पदाच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून, त्या आपल्या कार्यभार स्वीकारण्याच्या तारखेपासून तीन वर्षांपर्यंत ही जबाबदारी सांभाळतील.

पुनम गुप्ता (Poonam Gupta) यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, मेरीलँड विद्यापीठ (USA) येथे अध्यापन केले असून, भारतीय सांख्यिकी संस्था (ISI), दिल्ली येथे त्यांनी अतिथी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. गुप्ता यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (National Institute of Public Finance and Policy) येथे RBI चेअर प्रोफेसर आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स (ICRIER) येथेही प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे. तसेच NCAER मध्ये प्रवेश करण्यापूर्वी जवळपास दोन दशके त्या वॉशिंग्टन डिसी येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेत (World Bank) वरिष्ठ पदांवर कार्यरत होत्या.

पूनम गुप्ता (Poonam Gupta) यांनी मेरीलँड विद्यापीठ (USA) येथून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. प्राप्त केली असून, दिल्ली विद्यापीठाच्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (Delhi School of Economics) येथूनही अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. दरम्यान, 1998 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील पीएच.डी. संशोधनासाठी EXIM बँक पुरस्कार मिळाला होता.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.