शिवाजीपार्कमधील नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे काम निकृष्ट

मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली असून त्यातील काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, शहर भागातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान(शिवाजीपार्क) परिसरातील रस्त्याचेही सिमेंट काँक्रिट करण्यात आले. सेनापती बापट चौक ते शिवाजी महाराज उद्यानपर्यंत जाणाऱ्या या सिमेंट कॉक्रिटच्या रस्त्यांचे काम निकृष्ट झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेला हा रस्ता मागील पाच ते सहा दिवसांपासून वाहतुकीसाठी खुला करुन देण्यात आला आहे. परंतु या नव्याने बांधलेल्या या रस्त्यावरच तडे पडलेले दिसून येत आहेत.

( हेही वाचा : नागपूर जीपीओ कार्यालयात पार्सलमध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट)

रस्त्याच्या पृष्ठभागासह मॅनहोल्सच्या भागातही तडे

महापालिकेच्या जी उत्तर विभागातील रानडे मार्गावरील सेनापती बापट चौकापासून एम बी राऊत मार्ग (दक्षिण) व केळुसकर मार्गाला छेदून जाणाऱ्या रस्त्यांचे मागील दोन महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, मागील आठ दिवसांपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ते वाहतुकीसाठी खुले करून देण्यात आले आहे. तर पदपथाचे काम व्हायचे असून पावसाळा पूर्ण झाल्यानंतर पदपथांचे काम केले जाणार आहे. परंतु चार ते पाच दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी खुल्या केलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या दिसत आहेत. रस्त्याच्या पृष्ठभागासह मॅनहोल्सच्या भागातही तडे पडलेले पहायला मिळत आहे.

सिमेंट काँक्रिटते रस्ते जास्त काळ टिकतात म्हणून म्हणून या रस्त्याचे पुन्हा सिमेंट काँक्रिट करण्यात आले. हा रस्ता पूर्वी सिमेंट काँक्रिटचा होता. परंतु या रस्त्यावर भेगा पडल्याने पुन्हा या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. परंतु नव्याने बनवलेल्या रस्त्यावरही तडे गेल्याचे दिसून येत असून जर पाच ते सहा दिवसांमध्येच रस्त्यावर तडे पडलेले पहायला मिळत असतील तर येत्या काही दिवसांमध्ये या तड्यांचे मोठ्या भेगांमध्ये रुपांतर होण्याची भीती वर्तवली जात आहे.

या रस्त्याच्या खालून युटीलिटीज टाकण्यासाठी स्वतंत्र डक्टची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही कंपनी तथा संस्थेकडून युटीलिटीजमध्ये बिघाड झाल्यास किंवा नव्याने टाकण्याचा प्रयत्न झाल्यास या डक्टमधून त्या टाकता येणार आहे. यासाठी नव्याने खोदकाम करण्याची गरज नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here