Population : लोकसंख्येत चीन नंबर वन; 1 जुलैला भारताची लोकसंख्या 139 कोटी

187

भारताची लोकसंख्या 139 कोटी झाली आहे, चीनची लोकसंख्या १ अब्ज ४२ कोटी ५६ लाख ७१ हजार आहे. त्यामुळे जागतिक लोकसंख्येत चीन नंबर वन आहे, अशी माहिती मंगळवार, 25 जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांनी दिली.

केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सांगितले की, संयुक्त राष्ट्र (UN), आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभाग, लोकसंख्या विभाग आणि जागतिक लोकसंख्या प्रॉस्पेक्टस 2022 च्या ऑनलाइन प्रकाशनानुसार, 1 जुलै 2023 रोजी चीनची लोकसंख्या अंदाजे 1 अब्ज 42 कोटी 56 लाख 71 हजार होती.

(हेही वाचा Manipur : मणिपूरमध्ये म्यानमारमधून ७१८ नागरिकांची घुसखोरी; हुसकावून लावण्याचे आसाम रायफल्सला आदेश )

केंद्राने लेखी प्रश्नाला दिले उत्तर 

लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने आपल्या अहवालात 1 जुलै 2023 रोजी भारताची लोकसंख्या 1 अब्ज 39 कोटी 23 लाख 29 हजार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. केंद्र सरकारने 28 मार्च 2019 रोजी 2021 मध्ये जनगणना करण्यासाठी राजपत्रात अधिसूचना दिली होती. परंतु यावर्षी (2019) कोविडच्या आगमनामुळे जनगणनेशी संबंधित कामे थांबवण्यात आली.

जगातील 800 कोटीव्या बालकाचा जन्म

जगातील 800 कोटीव्या बालकाचा जन्म नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. रिअल टाइममध्ये लोकसंख्येचा मागोवा घेणाऱ्या https://www.worldometers.info/ या साइटनुसार, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास या मुलाचा जन्म झाला. यासह जगाची लोकसंख्याही 8 अब्ज (800 कोटी) झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.